You are currently viewing राज्याचे सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण यांचे भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून जल्लोषात स्वागत

राज्याचे सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण यांचे भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून जल्लोषात स्वागत

खारेपाटण :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आगमन होताच सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी देखील यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वागत केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष किरण चव्हाण, वैभववाडी तालुका अध्यक्ष मारुती मोहिते, देवगड तालुका अध्यक्ष संतोष साळसकर, कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र निकम, लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख वसंत चव्हाण, युवा पदाधिकारी गणेश चव्हाण व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा