You are currently viewing जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये सर्व श्वानांना श्वान दंश प्रतिबंधक लस टोचण्यात येणार…

जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये सर्व श्वानांना श्वान दंश प्रतिबंधक लस टोचण्यात येणार…

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये सर्व श्वानांना मोफत शान दंश प्रतिबंधक लस ( रेबिज) चे इंजक्शन टोचण्यात येणार आहे. सध्या गोव्यातील सर्व श्वानांना रेबिजची लस देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये ही लस देण्यात येणार आहे. मिशन रॅबिज अंतर्गत डॉ. मुरुगन अप्पुपिलाई, संचालक, शिक्षण, मिशन रॅबिज व जागतिक पशुवैद्यकीय सेवा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या तिन्ही तालुक्यांमधील भटक्या आणि पाळीव अशा दोन्ही प्रकारच्या श्वानांना ही लस देण्यात येणार आहे. ही मोहीम मिशन रॅबीज या संस्थेमार्फत मोफत राबविण्यात येणार आहे.

       या रेबिज लस देण्याच्या मोहिमेमुळे श्वान दंश झाल्यास होणारा रेबिज हा आजार थोबवण्यास मदत होणार आहे. तसेच हे तिन्ही तालुके रेबिज मुक्त होण्यासही मदत होईल. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ही मोहिम राबविण्यासाठी मिशन रॅबिज, वर्ल्ड वाईड वेटर्नरी सर्विसेस या संस्थेस मान्यता दिली आहे. तरी या मोहिमेस या तिन्ही तालुक्यांमधील सर्व श्वान प्रेमींनी व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा परीषद अध्यक्षा समिधा नाईक व पशु संवर्धन अधिकारी डॉ. दिलीप शिंपी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =