You are currently viewing दहावी, बारावीच्या पुरवणी परिक्षेचा निकाल जाहीर

दहावी, बारावीच्या पुरवणी परिक्षेचा निकाल जाहीर

मुंबई :
दहावी आणि बारावीच्या पुरवणी परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता येणार आहे. रामहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फेत बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर आणि लेखी परीक्षा २० नोव्हेंबर ते १० डिसेंबरदरम्यान घेण्यात आली होती. त्या परिक्षेचा हा निकाल आहे. दहावीचा निकाल ३२.६० टक्के तर बारावीचा निकाल १८.८१ टक्के इतका लागला आहे.

ऑनलाइन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

गुण पडताळणीसाटी २४ डिसेंबरपासून अर्ज करता येणार आहे.

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळामधून विज्ञान, कला, वाणिज्य आणि एएचसी व्होकेशनल या शाखांतील एकूण ६९५४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ६९२७४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. यापैकी १२७५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी १८.८१ टक्के आहे.

दहावाची प्रात्यक्षित परीक्षा १८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर आणि लेखी परीक्षा २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर कालावधीत पार पडली होती. या परीक्षेसाठी नऊ विभागीय मंडळांमधून ४४०८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४१३९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १३४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या निकालाची टक्केवारी ३२.६० इतकी आहे. एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण होऊ न शकलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या १९८१२ इतकी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा