You are currently viewing सावंतवाडी-यशवंतराव भोसले पॉलीटेक्निकच्या ८३ विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी…

सावंतवाडी-यशवंतराव भोसले पॉलीटेक्निकच्या ८३ विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी…

“जॉब फेअर कॅम्पस ड्राईव्ह” च्या माध्यमातून निवड; यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेकडून कौतुक…

सावंतवाडी

येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये नुकताच “जॉब फेअर कॅम्पस ड्राईव्ह” संपन्न झाला. यावेळी पुणे येथील सहा नामांकित कंपन्यांमार्फत विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकसोबतच इतर तंत्रनिकेतन संस्थांचे विद्यार्थी देखील यामध्ये सहभागी झाले होते. दरम्यान या जॉब फेअरचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या एकूण ८३ विद्यार्थ्यांची यशस्वी निवड झाली आहे.
अँफेनॉल ही इलेक्ट्रो-मेकॅनिकल प्रॉडक्टस बनवणारी तसेच ऍडव्हान्स इंटरकनेक्ट सिस्टीम, क्रॅंकशाफ्ट्स व रेल्वे सामुग्रीचे सुटे भाग बनविणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीच्या पुणे येथील प्रकल्पासाठी कॉलेजच्या १५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
अमेरिकन ऍक्सल मॅन्युफॅक्चरिंग ही रियर ऍक्सल तसेच इतर ऑटोमोटिव्ह पार्ट्स बनवणारी अमेरिकन कंपनी आहे. या कंपनीच्या पुणे येथील प्रकल्पासाठी कॉलेजच्या ५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. जीकेएन ही एरोस्पेस व ऑटोमोटिव्ह कंपोनेंट्स बनविणारी आघाडीची ब्रिटिश कंपनी आहे. तिच्या पुणे येथील प्रकल्पासाठी कॉलेजच्या ७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. जॉन डिअर ही ट्रॅक्टर तसेच कृषी विषयक अवजारे बनविणारी आघाडीची अमेरिकन कंपनी आहे. तिच्या पुणे येथील प्रकल्पासाठी कॉलेजच्या १५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स ही ऑटोमोटिव्ह सेक्टरमधील वाहनांचे लाईटस बनविणारी कंपनी आहे.-या कंपनीच्या पुणे येथील प्रकल्पासाठी कॉलेजच्या १८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. टाटा ऑटोकॉम्प ही वाहन उद्योगाला सुटे भाग पुरविणारी आघाडीची कंपनी आहे. या कंपनीमध्ये कॉलेजच्या ५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. डॅना ही वाहन उद्योगातील सुटे भाग निर्मिती करणारी तसेच इलेक्ट्रिक वाहनांचे पार्ट्स बनविणारी अमेरिकन कंपनी आहे. कंपनीच्या पुणे येथील प्रकल्पासाठी १५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तर नॉर ब्रिम्स ही वाहनांची ब्रेकिंग सिस्टिम बनविणारी आघाडीची जर्मन कंपनी आहे. तिच्या पुणे येथील प्रकल्पासाठी कॉलेजच्या ३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. दरम्यान सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले व प्राचार्य गजानन भोसले यांनी अभिनंदन केले आहे. हा कॅम्पस ड्राईव्ह आयोजित करण्यासाठी कॉलेजच्या ट्रेनिंग प्लेसमेंट सेलचे विभाग प्रमुख प्रा. मिलिंद देसाई यांनी विशेष मेहनत घेतली. संस्थेमार्फत त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा