*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी, प्रशासक श्रीशब्द लालित्य समूह लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आभास असल्या सारखी*
(देवप्रिया/कालगंगा वृत्त)
तू जरा जवळी रहा आभास असल्या सारखी
हा भले बिलगू नको मज श्वास असल्या सारखी
दरवळे जो गंध भवती मोगऱ्यासम त्यात मी
माळ सखये कुंतली तू खास असल्या सारखी
जीवनी मी साथ काट्यांसारखी तुजला दिली
ये फुलूनी तू तरी मधुमास असल्या सारखी
चिंतनी तू, छंदही तू, तूूच राज्ञी, स्वामिनी
रातदिन स्वप्नात येते ध्यास असल्या सारखी
तू दिल्या जखमा उरी मी केवढ्या कुरवाळल्या
राहते का दूर तू दुस्वास असल्या सारखी
🖊️दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६
