You are currently viewing साळीस्ते येथे कारच्या भीषण अपघात दोघांचा मृत्यू

साळीस्ते येथे कारच्या भीषण अपघात दोघांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात;टॉयटो कार दुभाजकाला आदळली

कणकवली

मुंबई-गोवा महामार्गावर साळीस्ते येथे कारची दुभाजकाला धडक बसून भीषण अपघात झाला. हा अपघात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास झाला.या अपघातात संतोष पांडुरंग हरमळकर (वय ४८,प्रभादेवी मुंबई, मूळ रा.पेडणे गोवा),सुधीर अर्जुन राणे (वय -५६ वर्ष ,रा,अंधेरी ,मुबंई) हे दोघे जण मयत झाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,मुंबई येथून गोव्याच्या दिशेने टॉयटो चारचाकी कार जात असताना साळीस्तेत दुभाजकाला आदळून भीषण अपघात झाला आहे. संतोष पांडुरंग हरमळकर (वय ४८,प्रभादेवी मुंबई, मूळ रा.पेडणे गोवा),सुधीर अर्जुन राणे (वय -५६ वर्ष ,रा,अंधेरी ,मुबंई) हे दोघे जण मयत झाले आहेत.तर आकांक्षा संतोष हरमलकर(वय-२३,रा.प्रभादेवी मुबंई, मूळ रा.पेडणे गोवा) या जखमी झाल्या आहेत.तर कारमध्ये अन्य एक जखमी झाले आहेत.अधिक उपचारासाठी जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, कॉन्स्टेबल रुपेश गुरव व महामार्ग वाहतूक पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य करत वाहतूक सुरळीत केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा