You are currently viewing डॉ. हेमंत वसेकर एक शिस्तबध्द अधिकारी- के मंजुलक्ष्मी

डॉ. हेमंत वसेकर एक शिस्तबध्द अधिकारी- के मंजुलक्ष्मी

नूतन सी ई ओ प्रजित नायर यांच स्वागत तर मावळते सी ई ओ डॉ. हेमंत वसेकर यांचा निरोप समारंभ.

सिंधुदुर्ग:

जिल्हा परिषदेचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हेमंत वसेकर यांचा निरोप समारंभ व नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांचा स्वागत समारंभ येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, महिला व बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, जि प सदस्य अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी मावळते सीईओ हेमंत वसेकर यांना जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर नूतन सी ई ओ प्रजित नायर यांना जिल्हाधिकारी के मंजु लक्ष्मी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

निरोप घेताना सी ई ओ डॉक्टर हेमंत वसेकर म्हणाले की, गौरवशाली परंपरा असलेल्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात आपल्याला काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो तसेच सिंधुदुर्ग जिल्हा हा खरोखरच चांगला आहे या जिल्ह्यात आपण दोन दिवस प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. आपण जिल्हा विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत नूतन सी ई ओ प्रजित नायर यांनी स्वागत समारंभाला व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 1 =