You are currently viewing केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून मालवणात कोट्यावधींचा विकासनिधी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून मालवणात कोट्यावधींचा विकासनिधी

राज्य शासनाच्या बजेट अंतर्गत ४२ कोटींच्या १० कामांना मंजुरी ; भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर

मालवण

राज्यातील भाजप शिवसेना युती सरकारने देवबाग, तारकर्ली, वायरी भूतनाथ, तळाशील तोंडवळी, सर्जेकोट, मालवण शहर धुरीवाडा कुरण आदी ठिकाणी राज्य सरकारने सादर केलेल्या २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात धूप प्रतिबंधक बंधारा आणि संरक्षक भिंतसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मागणीनुसार तब्बल ३३ कोटी निधी उपलब्ध झाला आहे. यासह शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या मागणीतून ३ कोटी ५० तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मागणीनुसार ५ कोटी ५० लाख निधी असा एकूण ४२ कोटी निधी मालवण तालुक्यात मंजूर झाला आहे.यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भूमिका महत्वपूर्ण ठरलीच. यासह पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विशेष पाठपुरावा व मागणी केल्याने मालवण तालुक्यास मोठा निधी प्राप्त झाला. अशी माहिती माहिती भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मागणीनुसार मंजूर झालेल्या कामांमध्ये देवबाग येथे धुपप्रतिबंधक बंधारा भाग २ यासाठी ५ कोटी, देवबाग विठ्ठल मंदिर ते ख्रिश्चन वाडी येथे समुद्राकडील बाजूस धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी ५ कोटी, देवबाग श्रीकृष्णवाडी येथील बापू राऊळ घर ते अरविंद राऊळ घरापर्यंत खाडी किनारी धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे ३ कोटी, तळाशील तोंडवळी येथे विलास झाड घर ते गोविंद पेडणेकर घर धुपप्रतिबंधक बंधारा ५ कोटी, सर्जेकोट सुवर्ण कडा धुपप्रतिबंधक बंधारा भाग २ यासाठी ५ कोटी, वायरी भुतनाथ तेली पाणंद माडये घरापर्यंत संरक्षक भिंत ५ कोटी, मालवण नगरपरिषद हद्दीतील धुरीवाडा जामसंडेकर घर ते कुरण खाडी किनारी बंधारा कमजोडरस्ता ५ कोटी निधी मंजूर झाला आहे. तर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या निधीतून निशाण काठी ते तारकर्ली समुद्र धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी ३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मागणीनुसार ३ कोटी ५० लाख निधी मसुरकर खोत जुवा येथे धुपप्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी व वायरी भुतनाथ तेली पाणंद ते निशाणकाठी समुद्र किनारी बंधारा बांधणे २ कोटी निधी मंजूर झाला आहे. असा एकूण ४२ कोटी निधी मंजूर झाला आहे.याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,यांच्यासह पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 19 =