You are currently viewing मुलींच्या क्रिकेट संघाला नीलेश राणेंचा मदतीचा हात…

मुलींच्या क्रिकेट संघाला नीलेश राणेंचा मदतीचा हात…

मध्यप्रदेशच्या प्रवासाची घेतली जबाबदारी ; उद्या संघास आर्थिक मदत सुपूर्द करणार…

मालवण

कुडाळ- मालवण मतदार संघातील मुलींच्या लेदरबॉल क्रिकेट संघाची मध्यप्रदेश येथे होणाऱ्या सामन्यासाठी निवड झाली आहे. या संघाला आर्थिक मदतीशिवाय तेथे जाणे शक्य नव्हते. मात्र याची माहिती मिळताच या मुलींच्या संघाच्या प्रवासाची जबाबदारी भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी घेतली आहे. उद्या येथील भाजप कार्यालय येथे ही आर्थिक मदत सुपूर्द केली जाणार आहे. अशी माहिती भाजपचे शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी दिली.

मालवण कुडाळ विधानसभेतील १८ वर्षाखालील मुलींच्या लेदर क्रिकेट संघाची मध्यप्रदेश येथे पुढील सामना खेळण्यासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थिनी सर्वसामान्य कुटुंबातील असून आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मध्यप्रदेश मध्ये जाणे शक्य होत नव्हते. सुदेश आचरेकर, दीपक पाटकर यांनी भाजपा नेते नीलेश राणे यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर श्री. राणे यांनी मुलींच्या संघाच्या प्रवासाचा खर्च उचलून आर्थिक हातभार लावुन खिलाडूवृत्तीला प्रोत्साहन दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × one =