सावंतवाडीतील महावितरणच्या कंत्राटी कामगारांचा एक लाखाचा विमा…

सावंतवाडीतील महावितरणच्या कंत्राटी कामगारांचा एक लाखाचा विमा…

मनसेकडून दखल, पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त वितरण…

सावंतवाडी तालुक्यातील महावितरण कंत्राटी लाईनमन यांचा एक लाख रुपयाचा अपघाती विमा व मेडिक्लेम अशा सर्व कंत्राटी लाईनमन कामगारांचा इन्शुरन्स पॉलिसी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एस एस भुरे व बांदा कनिष्ठ अभियंता अनिल यादव यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. तोक्ते चक्रीवादळात आपल्या जीवाची परवा न करता अनेक गावे अंधारात असताना प्रकाशात आणण्याकरता कामगारांनी मोलाची कामगिरी केली. याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष धीरज परब व महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष गणेश कदम यांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यातील कंत्राटी वीज कामगारांचे पॉलिसी मेडिक्लेम करण्याचे काम केले.

सावंतवाडी तालुक्यातील आरोस गावचे कंत्राटी वायरमन यांचा अपघातात निधन झाले. त्यावेळी ही सर्व घटना मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी दखल घेत लॉटरी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष गणेश कदम यांनी सदर कंत्राटी कामगारांचे इन्शुरन्स उतरवण्याचे ठरवण्यात आले. त्याप्रमाणे सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सदर पॉलिसीचे वितरण करण्यात आले. कामगारांचे हित जपणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या कामगारांना न्याय मिळण्याकरता एक प्रयत्न केला.
जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी सांगितले की, कंत्राटी कामगारांना महावितरणमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळावी याकरिता आमचे वरिष्ठ पातळीवर प्रयत्न चालू आहेत. यावेळी परिवहन सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी, एसटी परिवहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजू कासकर, माजी उपजिल्हाध्यक्ष ऍड. अनिल केसरकर, तालुका सचिव विठ्ठल गावडे, तालुका उपाध्यक्ष सुधीर राऊळ, मळेवाड विभागअध्यक्ष मंदार नाईक, शाखा अध्यक्ष राकेश परब, बाबुराव राऊळ, आनंद वसकर, मिलिंद तर्फे, सिद्धांत बांदेकर, मिलिंद सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा