You are currently viewing बहि:शाल शिक्षण मंडळ -पुणे कार्यशाळेस प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बहि:शाल शिक्षण मंडळ -पुणे कार्यशाळेस प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे / निगडी :

बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय कार्यशाळा ‘खानदेश मराठा मंडळाच्या ‘सभागृहात निगडी प्राधिकरण येथे संपन्न झाली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ईशस्तवनाने झाली. याप्रसंगी, बहि:शाल शिक्षण मंडळाचे संचालक, डॉ. हरिश्चंद्र नवले, सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रथम सत्रात ‘आनंदी वृध्दत्व या विषयावर श्री.आर. टी. वझरकर यांनी विचार मांडले. जेष्ठत्व आनंदी करण्याविषयी हसत खेळत मार्गदर्शन केले व ज्येष्ठांसाठी ज्येष्ठ नागरिक संघ वाढले पाहिजेत असे सांगितले.

द्वितीय सत्रात डॉ.कल्याणी हर्डीकर यांनी ‘सण,उत्सव, आहाराचे आयुर्वेदानुसार महत्त्व’ या विषयावर माहिती पूर्ण व्याख्यान दिले .ऋतूं प्रमाणे व सण उत्सवाप्रमाणे आहारात बदल आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

तृतीय सत्रात विश्वास पटवर्धन यांचा स्वभाव राशीचे हा कार्यक्रम झाला. विविध राशीच्या स्वभावाच्या गमती जमती व नातेसंबंधातील किस्से सांगून श्रोत्यांना मनमुराद हसवले.

चतुर्थ सत्रात , नंदिन सरीन व सहकाऱ्यांचा सुगम संगीताचा, भावविश्व हा बहारदार विविध हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. झुमका गिरा रे, ओ मेरी जोहराजबी या सारख्या गीतांना ज्येष्ठांनी नाचून दाद दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , संघाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनी केले .अध्यक्षा चाँदबी सय्यद यांनी प्रास्ताविक केले तर संपादक दिलीप गोसावी यांनी आभार प्रदर्शन केले. ज्येष्ठांची उपस्थिती लक्षणीय होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 4 =