You are currently viewing जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी मीना बोडके…

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी मीना बोडके…

वैभववाडी

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी वैभववाडी माजी सभापती मीना बोडके यांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष इर्शाद शेख यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी शशांक बावचकर, यांच्या सूचनेनुसार त्यांची ही निवड करण्यात आली आहे.
मिना बोडके या काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी याअगोदर महिला तालुका अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांच्या जिल्हा सचिवपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा