You are currently viewing साजंवात

साजंवात

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.स्मिता रेखडे यांची अप्रतिम काव्यरचना

जीवनी सांजवात उजळली
कातरवेळी गाभारी
आयुष्यभर तेवली कधी तेज
कधी मंद ज्योतीने
सरता सरता आठवणी
पुसटश्या स्मृतीकोशी
कडु गोड खरे खोटे कंगोरे
न उरले संध्यासमयी
जपता अलवार आत्मीयतेचा
मोहमयी पिसारा
सुखाची उधळण झेलुनी तृप्तता
सर्वागीं मोहरली
अवघे माझे माझे म्हणता
समाधानाने होता अलिप्त
भारलेले आयुष्य अलगद
साजंवेळी तेजात निरखले!!

सौ.स्मिता श्रीकांत रेखडे.
नागपूर.

प्रतिक्रिया व्यक्त करा