You are currently viewing एकपात्री बालकलाकार आर्या कदमचा सत्कार

एकपात्री बालकलाकार आर्या कदमचा सत्कार

‘मी सावित्रीबाई फुले बोलते’ एकपात्री प्रयोगाची यशस्वी वाटचाल

कणकवली

कलमठ येथील एकपात्री बालकलाकार आर्या किशोर कदम हिचा ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर तथा रात्रीस खेळ चाले मालिका फेम अण्णा नाईक यांच्या हस्ते पियाळी येथे गौरव करण्यात आला.

पियाळी आबा दाजी ग्रंथालयच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.यावेळी आर्या किशोर कदम हिचा :मी सावित्रीबाई फुले बोलते’ हा चौदावा प्रयोग सादर करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या अभिनेते माधव अभ्यंकर यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद सीईओ प्रजित नायर यांच्या उपस्थित कु. आर्या हीचा गौरव करण्यात आला.यावेळी कास्ट्राईब संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी संदीप कदम, आकाश तांबे, सुरेश तांबे, किशोर कदम तसेच तुषार भालेराव आदी उपस्थित होते. एवढी छोटीशी मुलगी अप्रतिम सावित्रीबाई यांची भूमिका साकारून प्रयोग सादर करते असे गौरवोद्गगार यावेळी माधव अभ्यंकर यांनी काढले.

कु. आर्या ही आपल्या प्रयोगातून सावित्रीबाई फुले यांचे विचार सखोलपणे समाजात पोचविण्याचा प्रयत्न करते. तिच्या या प्रयोगांना महाराष्ट्राच्या विविध भागातून उत्तम प्रतिसाद प्राप्त झाला आहे. यापूर्वी तिने राजमाता जिजाऊ व राजश्री शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी विषयावर वक्तृत्व स्पर्धेत राज्यस्तर आणि जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केले आहेत. याची दखल घेऊन हा तिचा गौरव करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =