You are currently viewing तुळस श्री जैतीर उत्सव 30 मे ला..

तुळस श्री जैतीर उत्सव 30 मे ला..

वेंगुर्ला :

 

दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान, नराचा नारायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुळस गावचे ग्रामदैवत श्री जयंती देवाचा वार्षिक उत्सव ३० मे पासून सुरू होत आहे. त्यानिमित्त श्री देवी, सातेरी, देवस्थान जैतीर समिती तुळसमार्फत नियोजन करताना मंदिराची रंगरंगोटी, परिसर स्वच्छता, बाजारपेठ थाटणे व इतर कामांची लगबग सुरू झाली आहे.

जागृत असलेल्या या देवाच्या दर्शनासाठी मुंबई, ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगाव, सिंधुदुर्ग व नजीकच्या गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे या उत्सवावर मंदीचे सावट होते. मात्र, अलीकडेच कोरोना संसर्ग संपुष्टात असल्याचे चित्र असल्याने पूर्वी प्रमाणेच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळणार असल्याने देवस्थान समिती नियोजनाच्या कामात व्यस्त आहे.

सलग ११ दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा