You are currently viewing केसरीत ‘EL NINO’ जागरूकता शिवार फेरीला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

केसरीत ‘EL NINO’ जागरूकता शिवार फेरीला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

केसरीत ‘EL NINO’ जागरूकता शिवार फेरीला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कृषी विभागातर्फे जीवामृत, बीजप्रक्रिया व नैसर्गिक शेतीबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन

सावंतवाडी :

खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर मौजे केसरी येथे कृषी विभागाच्या वतीने “EL NINO जागरूकता शिवार फेरी कार्यक्रम”, जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक, संवाद सेतू तसेच बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी विजय गंबरे यांनी उपस्थित शेतकरी वर्गास EL NINO मुळे उद्भवू शकणारे संभाव्य परिणाम, बदलते हवामान आणि त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच नैसर्गिक शेतीचे महत्त्व, कमी खर्चात अधिक उत्पादन आणि सेंद्रिय पद्धतींचा अवलंब करण्याबाबत माहिती दिली.

उप कृषी अधिकारी व्ही. के. पाटील यांनी बीजप्रक्रिया व बियाणे उगवण चाचणी याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तर सहाय्यक कृषी अधिकारी टी. सी. राणे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

या कार्यक्रमास केसरी गावातील सुमारे ५२ शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमातून खरीप हंगामासाठी उपयुक्त तांत्रिक माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा