वाइल्ड कोकण सावंतवाडी आयोजित वन्यजीव सप्ताह १ऑक्टो ते ७ऑक्टो……

झूम अँपच्या लिंक वर होतात कार्यक्रम….

सावंतवाडीतील वाइल्ड कोकण या संस्थेने पर्यावरणाप्रती आणि वन्यप्राण्यांच्याप्रती असलेले प्रेम आणि आवड जपण्यासाठी तसेच सर्वसामान्य लोकांच्या मनात प्राण्याच्याविषयी आकर्षण निर्माण होऊन वन्यप्राण्यांचे रक्षण व्हावे, जनमानसात त्यांच्या विषयी खरी आणि सत्य माहिती पोहचावी. पर्यावरण आणि सद्ध्याचे असलेले विविधांगी लोकजीवन, पर्यावरणात असणाऱ्या वनस्पती, जैवविविधता, त्यांचे औषधी गुणधर्म. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळणारे विविध पक्षी, पाणी, फुलपाखरे यांची सखोल माहिती, पक्षी प्राणी यांचे काढले जाणारे फोटो आणि त्यातून सिंधुदुर्गातील जनतेस मिळणारी माहिती, सिंधुदुर्गातील वन्यजीवन, सागरी जीवन याची सखोल माहिती वन्यप्राणी सप्ताहाच्या निमित्ताने सिंधुदुर्गासहित इतरही लोकांना होण्यासाठी संस्थेने झूम अँप चा वापर करत लिंकच्या आधारे लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे.
१ ऑक्टोबर रोजी पत्रकार शिवप्रसाद देसाई यांनी पर्यावरण व लोकजीवन या विषयी सखोल माहिती दिली. २ऑक्टोबरला वनस्पती शास्त्रज्ञ तथा प्राध्यापक डॉ.बाळकृष्ण गावडे यांनी वनस्पती व जैवविविधता याविषयावर अभ्यासपूर्ण बोलले. डॉ बाळकृष्ण गावडे यांनी आंबोली जंगलातील अनेक औषधी वनस्पतींवर सखोल अभ्यास केला आहे. ३ ऑक्टोबर ला डॉ गणेश मर्गज सहा.प्राध्यापक श्री पंचम खेमराज महाविद्यालय यांनी सिधुदुर्गातील पक्षी विविधता विषयी माहिती दिली.
आज ४ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० ते ९.३० वाजेपर्यंत डॉ धिरेंद्र होळीकर, प्राध्यापक मी आणि माझी फोटोग्राफी सदरातून सिंधुदुर्गातील पक्ष्यांविषयी माहिती देतील. ५ ऑक्टोबर रोजी हेनंत ओगले सिंधुदुर्गातील फुलपाखरे आणि त्यांची विविधता या विषयावर बोलतील. ६ ऑक्टोबर ला सिंधुदुर्गातील वन्यजीव या विषयावर सुभाष पुराणिक साहेब विचार मांडणार आहेत. तर ७ ऑक्टोबर रोजी प्रा.नागेश दप्तरदार सिंधुदुर्गातील सागरी जीवनावर सखोल माहिती देणार आहेत.
रोजचे कार्यक्रम रात्री ८.३० ते ९.३० यावेळेत झूम अँप वर होणार आहेत. या कार्यक्रमाची झूम लिंक दिली जाणार आहे. संपर्कासाठी ९४२०२०९०१३ हा मोबाईल क्रमांक देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील पर्यावरण, पक्षी,प्राणी प्रेमींनी जरूर याचा लाभ घ्यावा असे वाइल्ड कोकण, सावंतवाडी तर्फे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 7 =