You are currently viewing सुकन्या कु. ऋतुजा रविंद्र मस्के यांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचा घेतलेला वृतांत..

सुकन्या कु. ऋतुजा रविंद्र मस्के यांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचा घेतलेला वृतांत..

‘येरळामाई जनसहयोग फाऊंडेशन, हणमंत वडीये’ या संस्थेच्या वतीने गावातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला……

या आयोजित कार्यक्रमात
गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री. जयराम मोरे (बापू) यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्री. उद्धव मोरे (बापू) यांनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
श्री. संजय मोरे (सर) यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अनुभवातील काही दाखले देत, त्यांनी विद्यार्थ्यांना वास्तवाचे भान करुन दिले.


श्री राहुल गुरव यांनी यशाने हुरळून जाऊ नका व अपयश आले तर खचून न जाता आपल्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या, असे आवाहन केले.
डॉ. विवेकानंद मोरे यांनी ‘अपयश आले तर मार्ग बदला, ध्येय नव्हे.’ हा विचार विद्यार्थ्याच्या मनावर चांगलाचा बिंबवला.

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून कु. सुविधा मोरे व चि. सुयश मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उज्जल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरवासोबतच राष्ट्रीय पातळीवरील RSNC (Roller Skating National Championship) या स्पर्धेत रौप्य पदक पटकविलेला आपल्या गावचा गुणवान सुपुत्र. कु. रियांश हणमंत मोरे याचाही गौरव केला. यावेळी श्री. उद्धव बापू यांनी आपल्या मार्गदर्शनात खेळांचे महत्त्व सांगताना त्यांनी रियांशला Roll Model म्हणून विद्यार्थ्यांसमोर उभे केले.

आजच्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून प्रा. डॉ. अशोक मोरे सर यांनी अध्यक्ष स्थान स्विकारले व बहूमोल असे मार्गदर्शन केले. त्यावेळी ते म्हणाले, की मार्क्स हा फक्त आकडा असतो. त्यावरून आपले भविष्य ठरत नाही. समाजातील व गावातील प्रत्येक व्यक्तीकडे आपण Idol म्हणून पाहू शकतो. कारण प्रत्येकाकडे एक वेगळा गुण असतो. त्यामुळे सगळ्यांकडे आपण एका सकारात्मक दृष्टीकोनातून पाहायला हवं. त्याच बरोबर आपली संगत चांगली असायला हवी. आपल्या मित्राकडून चांगला गुण घ्यायला हवा व आपल्यातील चांगला गुण त्याला द्यायला हवा.’

क्रीडा व इतर कला क्षेत्रांबद्दल बोलताना त्यांनी, ‘आपण जसे शैक्षणिक प्रवाहात ओढले जातो, तसे आपण आपले छंद व कला जोपासत नाही, पण तसे न करता ते जोपासायला हवेत.’ असा बहुमोल सल्ला दिला. यावेळी त्यांनी आपल्या गावातील श्री. सुभाष मंडले, जे पुण्यात चाकणला एका कंपनीत कार्यरत असून देखील आपला लेखनाचा छंद जोपासला आहे. तसेच अभियंता श्री. प्रदीप मस्के हे देखील पुण्यात कार्यरत आहेत आणि त्यांनीही त्यांचा कविता करण्याचा छंद मन: पूर्वक जोपासला आहे. यांची उदाहरणे समोर ठेवली.
आपल्या पुढील मार्गदर्शनामध्ये शेक्सपिअर, हिटलर, हर्षद मेहता, सुंदर पिछाई यांचे दाखले देत विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरणा निर्माण केली.

S. Strength

W- Weakness

O- Opportunity

C- Challange

या शब्दाचा विस्तार करून सांगत आपल्या यशामध्ये हे सगळं किती महत्त्वाचं आहे, हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारावी उत्तीर्ण विद्यार्थी चि. ओंकार मोरे यांनी केले व
शेवटी कु. ऋतुजा रविंद्र मस्के यांनी
शेवटचे आभाराचे पुष्प गुंफले.
यावेळी, त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत, गावचे सर्व प्रतिष्ठीत व वरिष्ठ व्यक्तींचे आभार मानले व येरळामाई जनसहयोग फाऊंडेशनचे विशेष मनःपूर्वक आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला.

या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. उद्धव मोरे, श्री. संजय मोरे (सर), श्री.जयराम बापू, श्री. चंद्रशेखर मोरे, श्री. साहेबराव मोरे (बाबा), श्री. मुगटराव गुरव, श्री. राहूल गुरव तसेच इतर प्रतिष्ठित मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले व दहावी, बारावीचे विद्यार्थी यांनी क्रार्यक्रमाची शोभा वाढवली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 4 =