You are currently viewing भुईबावडा – तळीवाडी ग्रामस्थांचे तहसील कार्यालयसमोर उपोषण

भुईबावडा – तळीवाडी ग्रामस्थांचे तहसील कार्यालयसमोर उपोषण

वाडीत जाणारा रस्ता खुला करा; या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक

वैभववाडी

भुईबावडा तळीवाडीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. तो तात्काळ खुला करण्यात यावा. या मागणीसाठी ग्रामस्थांनी वैभववाडी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
रस्त्यासाठी तळीवाडी येथील ग्रामस्थांनी सरकार दरबारी अनेक वेळा अर्ज विनंत्या व उपोषणे केली.

परंतु प्रशासनाने त्यांच्या मुलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. तहसील कार्यालय समोर मोठ्या संख्येने तळीवाडी ग्रामस्थ उपस्थित झाले आहेत. यावेळी तळीवाडी मंडळाचे अध्यक्ष हरी बाबाजी मोरे, सचिव प्रकाश चव्हाण, प्रकाश साळुंखे व मोठ्या संख्येने मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला व युवक कार्यकर्ते उपस्थित आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा