You are currently viewing जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये आठवड्यातून एक दिवस तक्रार निवारण दीन म्हणून सुरू करावा – रतनभाऊ कदम

जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये आठवड्यातून एक दिवस तक्रार निवारण दीन म्हणून सुरू करावा – रतनभाऊ कदम

राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार निवारण दीन सुरू आहे. तसाच तक्रार निवारण दीन सिंधुदुर्गातील पोलीस ठाण्यांमध्ये सुरू करण्यात यावा जेणेकरून सिंधुदुर्गातील जनतेला देखील तत्काळ न्याय मिळेल अशी विनंती राष्ट्रवादी नेते रतनभाऊ कदम यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सिंधुदूर्ग जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडे सुपूर्त केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्यातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेवर अनेक ठिकाणी अन्याय होत असुन काही आपसातले वाद जमीनी बळकावणे, विनाकारण त्रास देणे, मारामारी असे अनेक प्रकार दिवसेंदिवस घडत असून पोलिस ठाण्यामध्ये एखादया व्यक्तीने तक्रार नोंद केल्यावर त्याना जलद गतीने न्याय मिळत नाही. तरी याबाबत सामान्य जनतेचा विचार करून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस ठाण्यामध्ये आठवडयाचा एक दिवस धरून तक्रार निवारण सुविधा सुरू करावी जेणेकरून सर्वसामान्य मानसाला तत्काळ न्याय मिळाला जाईल. असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी चर्मकार समाज राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण, ब. स.पा. जिल्हाध्यक्ष रवींद्र कसालकर, विजय कुडाळकर, उल्हास असोलकर, दीपक कदम, बादल नांदोसकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 11 =