You are currently viewing नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी घेतली दोडामार्गात स्वच्छता मोहीम हाती

नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी घेतली दोडामार्गात स्वच्छता मोहीम हाती

पावसाळ्यापूर्वी गटार साफसफाई तसेच खुल्या जागेवर कचरा टाकू नका चे लागले पोस्टर्स

दोडामार्ग.

कसई दोडामार्ग नगराध्यक्ष व सत्ताधारी नगरसेवकांच्या सहकार्याने दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे, याची माहिती कसई दोडामार्ग नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली.
पावसाळ्यात तुंबणारी बाजारपेठेतील गटारे ही मुख्यत्वे खुली करून त्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा याचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.तसेच विविध ठिकाणी टाकण्यात येणारा कचरा गोळा करण्यात आला असून ठरलेल्या जागी सोडल्यास इतर ठिकाणी कचरा टाकण्यास प्रतिबंध आहे असे करताना कोणी आढळल्यास त्याला प्रतिबंधात्मक दंड ठोठावण्यात येणार आहे. अश्या ठिकाणी तशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा