You are currently viewing अन्यथा अन्याय दूर करण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल

अन्यथा अन्याय दूर करण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल

नवोदय प्रवेश प्रश्नी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी वेधले लक्ष

सिंधुदुर्ग

नवोदय विद्यालय प्रेवश परीक्षा प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्हयातील विद्यार्थ्यावर होत असलेला अन्याय दूर करण्यात यावा.अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी शिवसेना ,युवा सेना संघटनेला आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना दिला आहे. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची भेट घेतली.

यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, कणकवली माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक कन्हैया पारकर उपस्थित होते. या निवेदनात सुशांत नाईक म्हणतात, नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जि. प. च्या इ 5 वीच्या विद्यार्थ्यावर सातत्याने अन्याय होत आहे . याबाबत केलेल्या तालुका नुसार पडतळणी केली असता नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रियेत सावंतवाडी -65 कणकवली- 34 वैभववाडी -23 मालवण -18 दोडामार्ग -9 कुडाळ -4 वेंगुर्ला तालुका- 36 , देवगड- 1 विद्यार्थी परजिल्ह्यातील फक्त नवोदय विद्यालयाच्या परीक्षेच्या उद्देशाने फक्त 5 वी मध्ये प्रवेश घेतलेले त्यामूळे साशंकता निर्माण झाली आहे .

सांगेली येथील नवोदय विद्यालय हे सिंधुदुर्ग जिल्हयात असूनही आणि विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता असूनही सातत्याने केवळ चुकीच्या पद्धतीने कार्यपद्धती राबवली जात असल्याने काही प्रशालांमध्ये जिल्हयाबाहेरील विद्यार्थ्याना इयत्ता 5 वी मध्ये नाममात्र प्रवेश दिला जातो सदर विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत उपस्थित नसल्याचे आढळते आणि त्या मुलांना निकष डावलून नवोदय निवड चाचणी परीक्षेला बसविले जाते . वस्तुतः सदर निवड चाचणीला बसणारे विद्यार्थी हे इयत्ता 3 री व इयत्ता 4 थी मध्ये सुद्धा याच जिल्हयामध्ये शिक्षण घेत असणं आवश्यक आहे . परंतु ते इयता 5 वी मध्येच या जिल्हयामध्ये दाखल होत असल्याचे निदर्शनास येते . आणि अशा मुलांना सदर परीक्षेला बसू देणे हे निकषाला धरून नाही .

याबाबत योग्य ती दखल घेऊन ज्या प्रशालेमध्ये असे विद्यार्थी आढळतील त्या विद्यार्थ्यांना नवोदय निवड चाचणी परीक्षेला बसण्यास प्रतिबंध करावा जेणेकरून केवळ या जिल्हयातील विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळण्याची सुसंधी प्राप्त करून देऊन या जिल्हयातील विद्यार्थ्यावर होणार अन्याय दूर करावा अशी संघटनेची आग्रही मागणी आहे . अन्यतः या जिल्ह्यातील विद्यार्थ्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी संघटनेला आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल याची नोंद घ्यावी . असे सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांच्यावतीने सुशांत नाईक यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 2 =