You are currently viewing अभियंता कौस्तुभ गोवेकर यांचे हैद्राबादला निधन

अभियंता कौस्तुभ गोवेकर यांचे हैद्राबादला निधन

सावंतवाडी

सावंतवाडी सालईवाडा येथील मूळ रहिवासी आणि मुंबई येथे खासगी कंपनीत अभियंता असलेले कौस्तुभ मंगेश गोवेकर (३४) यांचे  सोमवारी सायंकाळी हैद्राबाद येथे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, सहा महिन्याची मुलगी, विवाहित बहीण असा परिवार आहे. वेंगुर्ले फळसंशोधन केंद्राचे निवृत्त अधिकारी आणि सावंतवाडी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष मंगेश गोवेकर यांचे ते सुपुत्र होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा