You are currently viewing लीलाविश फाउंडेशनमार्फत कासार्डे विद्यालयातील ३१विद्यार्थ्यांना१लाख५५हजारची शिष्यवृत्ती….

लीलाविश फाउंडेशनमार्फत कासार्डे विद्यालयातील ३१विद्यार्थ्यांना१लाख५५हजारची शिष्यवृत्ती….

पालकांच्या उपस्थितीत शिष्यवृत्ती वितरण सोहळा संपन्न

कासार्डे: 

लीलाविश फाउंडेशन च्या वतीने कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी १५५००० रु शिष्यवृत्तीचे वितरण स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर स्कूल कमिटी चेअरमन मधुकर खाडये,विद्यालयाचे प्राचार्य आर.व्ही.नारकर, ज्येष्ठ शिक्षक एस.डी.भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
लीलाविश फाउंडेशनचे संचालक महेश विश्राम नारकर, राजेश विश्राम नारकर यांनी ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागविण्यासाठी कासार्डे माध्यमिक विद्यालयाची निवड केली आहे.लीलाविश फौंडेशनच्या माध्यमातून कासार्डे विद्यालयातील इ.५वी ते इ. १०वी मधील ३१गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात प्रति विद्यार्थी ५ हजार रुपये प्रमाणे १लाख ५५हजार रू.शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
या शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यात कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, प्राचार्य आर.व्ही. नारकर यांनी लिलाविश फाऊंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक करून धन्यवाद देत विद्यार्थ्यांनी व पालकांनी ही शिष्यवृत्ती शैक्षणिक कामासाठी सत्ककारणी लावावी व शैक्षणिक प्रगतीची वाटचाल अशीच सुरु ठेवावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.तर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्यावतीने कु.श्रावणी नर हिने मनोगत व्यक्त करताना लीलाविश फाउंडेशनचे विशेष आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.डी.भोसले यांनी केले. या शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याला विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षकवृंदही फिजिकल डिस्टंसिंग ठेवून उपस्थित होते.
पुढील टप्प्यात याच विद्यार्थ्यांना इतक्याच रक्कमेची शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार आहे. मुळ पियाळी आमचे गाव असून मातृभुमितील, आमच्या गावातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी लिलाविश फौंडेशन यापुढे असेच कार्यरत राहणार आहे अशी माहिती लीलाविश फाऊंडेशनचे राजेश नारकर यांनी आमच्या प्रतिनिधीला फोनवरून बोलताना दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − eight =