अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज मालवण शहरात बस स्टँड नजीक महिलांना छत्र्या वाटप

अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज मालवण शहरात बस स्टँड नजीक महिलांना छत्र्या वाटप

मालवण

सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज मालवण शहरात बस स्टँड नजीक महिलांना छत्र्या वाटप करण्यात आल्या.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा आज ५ जून रोजी ५८ वा वाढदिवस युवक काँग्रेस सिंधुदुर्ग च्या वतीने आज कुडाळ मालवण विधानसभा उपाध्यक्षा पल्लवी तारी यांनी आज मालवण बस आगारानजीकच्या महिलांना छत्र्या वाटप करत साजरा केला यावेळी जिल्हा युवक प्रवक्ता अरविंद मोंडकर, जिल्हा युवक अध्यक्ष देवानंद लुडबे, शहर अध्यक्ष गणेश पाडगावकर, तालुका काँग्रेसचे सरदार ताजर व इतर पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी काँग्रेसच्या काळात खुप स्वस्ताई होती व आम्हा सामान्य नागरिकांना सर्व सुविधा मिळत होत्या परंतु आता नोटबंदि नंतर या महागाई काळात आता जीवन जगणे कठीण आहे तरी आपण आज करत असलेल्या सहकार्य बद्दल महिलांनी आभार मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा