You are currently viewing गोवा-तोरसे येथे पर्यटकांच्या कारला अपघात, एक गंभीर…

गोवा-तोरसे येथे पर्यटकांच्या कारला अपघात, एक गंभीर…

मुंबईहुन जात होते गोव्यात; तिघांना किरकोळ दुखापत…

पणजी

गोवा-तोरसे येथे मुंबईतील पर्यटकांच्या कारला झालेल्या अपघातात १ जण गंभीर जखमी झाला आहे.तर तिघांना किरकोळ दुखापत झाली.ही घटना काल मध्यरात्री मुंबई-गोवा महामार्गावर घडली.नंदकुमार दाते (२८),रा.पनवेल, असे गंभीर जखमीचे नाव आहे.दरम्यान जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर या अपघातात गाडीचा चक्काचुर झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,अपघातग्रस्त पर्यटक मुंबईहुन गोव्याच्या दिशेने जात होते.दरम्यान तोरसे येथे त्यांच्या कारला अपघात झाला.गाडी वरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या कडेला आदळली.दरम्यान कार मधून प्रवास करणारे ४ जण जखमी झाले आहेत.यातील एकाला गंभीर दुखापत झाली आहे.तर गाडीचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × one =