You are currently viewing मालवण तालुक्यात ७ जि. प तर १४ पं. स. मतदारसंघात निवडणूक

मालवण तालुक्यात ७ जि. प तर १४ पं. स. मतदारसंघात निवडणूक

मालवण :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक हालचालींना वेग आला आहे. निवडणूक विभागाकडून प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार मालवण तालुक्यात ७ जिल्हा परिषद तर १४ पंचायत समिती मतदारसंघ असणार आहेत. तालुक्यात एक जिल्हा परिषद व दोन पंचायत समिती मतदारसंघ वाढले आहेत. आराखडा तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती येथे प्रसिद्ध करण्यात आला असून २ जून ते ८ जून या कालावधीत हरकती नोंद करता येणार आहेत. त्यानंतर हरकती आल्यास २२ जून पर्यंत सुनावणी तर २७ जूनला अंतिम करण्यात येणार आहे.

सात जिल्हा परिषद मतदारसंघ :

मालवणात सहा जिल्हा परिषद मतदारसंघ होते. आता एक जिल्हा परिषद मतदारसंघ वाढला आहे. त्यामुळे सात मतदारसंघ झालेले आहेत. त्यानुसार आडवली-मालडी, आचरा, मसुरे-मर्डे, सुकळवाड, गोळवण, पेंडूर, वायरी भूतनाथ असे सात जिल्हा परिषद मतदारसंघ झालेले आहेत.

१४ पंचायत समिती मतदारसंघ :

मालवणात १२ पंचायत समिती मतदारसंघ होते. आता नवीन प्रभाग रचनेनुसार १४ पंचायत समिती मतदारसंघ झालेले आहेत. त्यामध्ये आडवली मालडी, शिरवंडे, चिंदर, आचरा, कोळंब, मसुरे मर्डे, पोईप, सुकळवाड, गोळवण, चौके, पेंडूर, वराड, कुंभारमाठ, वायरी भूतनाथ असे १४ पंचायत समिती मतदारसंघ झाले आहेत.

🔹आडवली-मालडी जिल्हा परिषद मतदारसंघात आडवली मालडी आणि शिरवंडे हे दोन पंचायत समिती मतदारसंघ झाले आहेत. त्यात आडवली मालडी पंचायत समितीमधील गावे : श्रावण, आडवली, मालडी, रामगड, निरोम, मठबुद्रुक, असगणी, गोठणे, किर्लोस ही गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

शिरवंडे पंचायत समितीतील गावे : हिवाळे, शिरवंडे, राठीवडे, असरोंडी, ओवळीये ही गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

🔹आचरा जिल्हा परिषद मतदार संघात चिंदर आणि आचरा हे दोन पंचायत समिती मतदारसंघ बनले आहेत. त्यातील चिंदर पंचायत समितीतील गावे : चिंदर, त्रिंबक, बुधवळे, कुडोपी, श्रावण, पळसंब.

आचरा पंचायत समितीतील गावे : आचरा, हडी (कोथेवाडा), वायंगणी ही गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

🔹मसुरे-मर्डे जिल्हापरिषद मतदारसंघात कोळंब आणि मसुरे -मर्डे हे दोन पंचायत समिती मतदारसंघ बनले आहेत. त्यातील कोळंब पंचायत समिती मध्ये : कोळंब, रेवंडी, मिर्याबांदा- सर्जेकोट, तोंडवळी, हडी- गावकर वाडा, जुवा पाणखोल ही गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

मसुरे मर्डे पंचायत समितीतील गावे – मर्डे, कांदळगाव, बांदिवडे खुर्द, देऊळवाडा ही गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

🔹सुकळवाड जिल्हा परिषद मतदारसंघात पोईप आणि सुकळवाड हे दोन पंचायत समिती मतदारसंघ बनले आहेत. पोईप पंचायत समितीतील गावे – पोईप, मसदे चुनवरे, वेरळ, मालोन्ड, वडाचा पाट, खोटले ही गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

सुकळवाड पंचायत समितीतील गावे : सुकळवाड, नांदोस, तिरवडे, हेदुळ, वायंगवडे ही गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

🔹गोळवण जिल्हा परिषद मतदार संघात गोळवण आणि चौके असे दोन पंचायत समिती मतदारसंघ बनले आहेत. त्यातील गोळवण पंचायत समिती मध्ये : गोळवण, माळगाव, चाफेखोल, बिळवस, महान, कुणकावळे ही गावे आहेत.

चौके पंचायत समिती मतदारसंघात : चौके, साळेल, धामापूर, आंबेरी, देवली ही गावे आहेत.

🔹पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघात पेंडूर आणि वराड असे दोन पंचायत समिती मतदारसंघ आहेत. त्यातील पेंडूर पंचायत समिती मतदारसंघात : पेंडूर, वरची गुरामवाड (गुरामनगरी), पेंडूर,खरारे, काळसे ही गावे आहेत.

वराड पंचायत समिती : वराड, वरची गुरामवाडी (कट्टा), तळगाव ही गावे आहेत.

🔹वायरी भूतनाथ जिल्हा परिषद मतदारसंघात कुंभारमाठ आणि वायरी भूतनाथ असे दोन पंचायत समिती मतदारसंघ झाले आहेत. त्यातील कुंभारमाठ पंचायत समिती : कुंभारमाठ, आनंदव्हाळ, घुमडे, कातवड, नांदरुख, तारकर्ली काळेथर ( काळेथर), कुणकावळे, आंबडोस ही गावे आहेत.

वायरी भूतनाथ पंचायत समिती : तारकर्ली काळेथर (तारकर्ली), वायरी भूतनाथ, देवबाग ही गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

ही प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली असून तहसील कार्यालय आणि पंचायत समिती येथे प्रसिद्ध करण्यात आला आहे. नकाशा सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. २ ते ८ पर्यंत हरकती घेता येणार आहेत. २२ जून पर्यंत सुनावणी होणार तर २७ जूनला अंतिम प्रभाग रचना अंतिम करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × one =