You are currently viewing सिंधुरत्न योजनेत पर्यटन व्यावसायिकांना समाविष्ट करा; विष्णू उर्फ बाबा मोंडकर

सिंधुरत्न योजनेत पर्यटन व्यावसायिकांना समाविष्ट करा; विष्णू उर्फ बाबा मोंडकर

मालवण :

 

पर्यटन व्यवसाय वाढीसाठी सिंधुरत्न योजनेत पर्यटन व्यावसायिकांना समाविष्ट करण्याची मागणी पर्यटन महासंघाचे अध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांनी सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

चांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातील शेतकरी ,मत्सव्यवसाय ,बचतगटातील व्यावसायिकांना यांत्रिकरणाची जोड देऊन ग्रामीण अर्थव्यवस्था,रोजगार निर्मितीचे कार्य आपल्या माध्यमातून उभे होत आहे.

पर्यटन व्यावसायिक महासंघ जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी कार्य करत असून सदर व्यवसाय वाढीसाठी काही विनंती महासंघ आपल्यास करीत आहे.

१)स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षणासाठी अनुदान योजना राबविणे.

२)नव्याने चालू होणाऱ्या जलक्रीडा,ऍडव्हेंचर प्रकल्प चालू करू इच्छिणाऱ्या व्यवसायींकांसाठी अनुदान योजना राबविणे.

३)टुरिस्ट परवाना लक्झरी कार खरेदी साठी योजना राबविणे.

४)मच्छिमार रापण संघाच्या कावनांचे मच्छिमार कल्चर सेंटर उभारण्यासाठी योजना राबविणे.

५)सद्यस्थितीत चालू असलेल्या होम स्टे,हॉटेल मधील रूम ३ स्टार दर्जाच्या होण्यासाठी प्रति रूम योजना राबविणे.

६)पर्यटन व्यावसायिकांना इन्व्हर्टर तसेच जनरेटर खरेदीसाठी योजना राबविणे.

७)जिल्हा पर्यटन सफरी साठी अद्यावत बस उपलब्ध करणे

८)अपिरिचित पर्यटन स्थळे विकासासाठी योजना राबविणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + four =