You are currently viewing सांगवे सोसायटीच्या निवडणुकीत भाजपाकडून शिवसेनेचा दारुण पराभव

सांगवे सोसायटीच्या निवडणुकीत भाजपाकडून शिवसेनेचा दारुण पराभव

१३ ही जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी

कणकवली

कणकवली तालुक्यातील सांगवे विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचा पुरता धुवा उडविला. 13 ही जागांवर भाजप ने एक तर्फे विजय मिळवा.यात शिवसेनेचे उमेदवार भाजपच्या उमेदवारांबरोबर स्पर्धाही करू शकलेले नाही.

सांगवे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक आज झाली या भाजप पुरस्कृत सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व 13 जागांवरती भाजपाचे उमेदवार निवडून आणले आहेत. सांगवे विकास सोसायटी निवडणूक शिवसेना आणि भाजपाकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. भाजपाच्या ताब्यात असलेली सांगवे सोसायटी आपल्या ताब्यात घेण्यासाठी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली रणनीती आखण्यात आली होती. परंतु भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी सतीश सावंत यांच्या रणनीतीला धूळ चारत सर्वच्या सर्व तेराही जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आणले आहेत.

भाजप पुरस्कृत श्री दिर्बा, रामेश्वर,महालिंगेश्वर सहकार पॅनलचे विजय झालेले उमेदवार अनिल चिंदरकर, नरेंद्र गावकर ,प्रकाश गावकर, आलबेल्ट घोंसावलीस,भालचंद्र सावंत ,महेंद्र सावंत, प्रभाकर सावंत, लक्ष्मीकांत वाळके, शालन डिसोजा, श्रद्धा सावंत, रमेश सापळे चंद्ररतन कांबळे,दिलीप चव्हाण अशा उमेदवारांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − 2 =