You are currently viewing कुणकेश्वर समुद्रात युवक बुडाला

कुणकेश्वर समुद्रात युवक बुडाला

देवगड

कुणकेश्वर – चांदेलवाडी येथील स्वराज सुनील पेडणेकर हा २१ वर्षीय युवक कुणकेश्वर समुद्रात बुडाला. त्याचा मृतदेह सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कुणकेश्वर- कातवणेश्वर समुद्र किनारी भागात आढळून आला. स्वराज हा दुपारी मित्रांसमवेत समुद्रात आंघोळीसाठी गेला होता. मात्र, पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने तो समुद्रात बुडाला. या घटनेमुळे कुणकेश्वर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × one =