You are currently viewing कणकवली हळवल शिवडाव मार्गावर डंपर पलटी

कणकवली हळवल शिवडाव मार्गावर डंपर पलटी

चालक किरकोळ जखमी

कणकवली

कणकवली हळवल शिवडाव मुख्य महामार्गावर हळवल ग्रामपंचायतच्या पुढे असलेल्या चढावा दरम्यान कणकवलीच्या दिशेने येणारा डंपर ब्रेक डाउन झाल्याने पलटी झाला.

पूर्णतः खडीने भरलेला डंपर पलटी झाल्याने डंपर चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. यादरम्यान कणकवली हळवल शिवडाव रस्त्यावर दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली. जखमी झालेल्या चालकाला हळवल येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले.

दरम्यान हळवल गावचे माजी पोलीस पाटील प्रकाश गुरव, ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन राणे, शिवा राणे व मार्गावरून प्रवास करणारे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या सहाय्याने मदतकार्य सुरू आहे. जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर पसरलेली खडी बाजूला करून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली.

मात्र हळवल -शिवडाव-शिरवळ – कणकवली मार्गावर वारंवार डंपर अपघात होऊ लागल्याने रहदारी व ये -जा करताना प्रवाशांना व वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून या मार्गाने प्रवास करावा लागत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 1 =