You are currently viewing 30 तोळे दागिने आणि 1 लाख 60 हजारांची रोकड चोरट्यांनी केली लंपास..

30 तोळे दागिने आणि 1 लाख 60 हजारांची रोकड चोरट्यांनी केली लंपास..

शॉपवर भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. चोरट्यांनी दुकान मालकाला धारधार शस्त्राने धाक दाखवला. तसेच दुकानातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. मात्र, यातील एका कर्मचाऱ्याने एका चोरट्याला पकडलं. परंतु, यातील दोन चोरट्यांनी दुकानातील 30 तोळे सोने आणि दीड लाखांची रोकड लंपास करत दुकानातून पळ काढला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. कर्मचाऱ्याने पकडलेल्या चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. आज दुपारी घडलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या चोरट्यांकडे बंदूक होती, असंही दुकान मालकाने सांगितलं आहे. पोलिस या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

कल्याण पूर्वेमधील नांदीवली परिसरात वैष्णवी ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. या दुकानात आज साडेतीन वाजेच्या सुमारास तीन चोरट्यांनी धारदार शस्त्राने धाक दाखवत दुकानातील ऐवज चोरी केले. यावेळी दरोडेखोरांनी दुकानातील 30 तोळे दागिने आणि 1 लाख 60 हजारांची रोकड लंपास केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानातील रुपाराम चौधरी या कर्मचाऱ्याने जखमी अवस्थेत एका चोरट्याला पकडले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. परंतु, यातील दोन चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 6 =