You are currently viewing मळगांव येथील “एक गाव एक संघ” क्रिकेट स्पर्धेत होडावडेचा “नो चान्स” संघ विजेता

मळगांव येथील “एक गाव एक संघ” क्रिकेट स्पर्धेत होडावडेचा “नो चान्स” संघ विजेता

तर मळगांव संघ उपविजेता

सावंतवाडी

मळगांव चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 या भव्य अशा “एक गाव एक संघ” ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत होडावडेचा “नो चान्स” संघ प्रथम विजेता तर “संपूर्ण मळगांव इलेव्हन” संघ उपविजेता ठरला. या विजेत्या संघांसहित उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व मालिकावीर यांना रोख पारितोषिक व ट्राॅफी तसेच दोन्ही संघांना रोख पारितोषिक व ट्राॅफी बहाल करण्यात आली.

प्रथम विजेता “नो चान्स होडावडे व उपविजेता संपूर्ण मळगांव संघ यांनी अंतिम सामन्यात बाजी मारली. तर नो चान्स, होडावडे संघाचा कर्णधार दाजी नाईक उत्कृष्ट फलंदाज, सिध्दु परब उत्कृष्ट गोलंदाज, विश्वनाथ सावळ उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व राजा नाटेकर मालिकावीर ठरला.

कै.आत्माराम परशुराम सावळ यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या ट्राॅफी व रोख पारितोषिक वितरण सोहळ्यात मळगांवचे उपसरपंच हनुमंत पेडणेकर, मळगांव चे उद्योजक तथा प्रथम पारितोषिकाची रक्कम दाते पांडुरंग राऊळ, द्वितीय पारितोषिकाची रक्कम दाते सिद्धेश तेंडोलकर, उद्योजक उदय जामदार, टिळक सावळ, तेजपाल सावळ सुदेश राऊळ, विश्वनाथ गोसावी, उद्योजक गोट्या राऊळ, माजी सरपंच निलेश कुडव, माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ गावकर, आयोजक दिपक सावळ, अमोल सावळ, प्रसाद जोशी, स्पर्धेसाठी महारकाटा मैदान उपलब्ध करुन दिलेले जाधव कुटुंबिय, कोकण लाईव्हचे सावंतवाडी प्रतिनिधी पत्रकार सुखदेव राऊळ तसेच मळगांव क्रिकेट प्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अटीतटीच्या ठरलेल्या व प्रत्येक सामन्यागणिक उत्कंठावर्धक तसेच रोमहर्षक ठरलेल्या या स्पर्धेसाठी कु. दिक्षिता दिपक सावळ व कु. हंसिका दिपक सावळ यांच्या तर्फे अनुक्रमे प्रथम व द्वितीय चषक पुरस्कृत करण्यात आला होता. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज,क्षेत्ररक्षक व मालिकावीर चषक तसेच रोख पारितोषिके बहाल करण्यात आली होती.

श्री देव धावगिरो कला क्रीडा मंडळ सावळ वाडा व फ्रेंड सर्कल मळगांवच्या वतीने मळगांव येथील महारकाटा मैदानावर या मळगांव चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत 32 संघ सहभागी झाले होते. मंगळवार दिनांक 12 एप्रिल 2022,13 एप्रिल 2022,15 एप्रिल 2022,16 एप्रिल 2022 व 17 एप्रिल 2022 या कालावधीत खेळवण्यात आलेल्या या पाच दिवसीय स्पर्धेसाठी मळगांवचे उद्योजक पांडुरंग राऊळ पुरस्कृत रोख रुपये रक्कम 50 हजार हे प्रथम पारितोषिक तर सिद्धेश तेंडुलकर पुरस्कृत रोख रुपये रक्कम 25 हजार हे रोख पारितोषिके तसेच मालिकावीर साठी समीर मळगांवकर चषक व टिळक सावळ यांच्याकडून रोख पारितोषिक, उत्कृष्ट फलंदाज साठी योगेश पारकर व अमोल सावळ यांच्याकडून चषक व संजय जाधव यांच्याकडून रोख पारितोषिक पुरस्कृत करण्यात आले होते. उत्कृष्ट गोलंदाजी साठी भजनीबुवा सुदेश राऊळ चषक व सुरज शिरोडकर यांच्याकडून रोख पारितोषिक ठेवण्यात होते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी विश्वनाथ गोसावी चषक पुरस्कृत करण्यात आला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − one =