You are currently viewing मैत्र

मैत्र

मैत्र

आनंद मनाच्या गाभाऱ्यातला,
पूजतो मनोमन देवावानी,
नसतो थारा तिथे दुःखाला,
दुःख फिरे तेव्हा रानीवनी.

मित्र म्हणती ज्यास जिवलग,
दुःख त्याच्याच मनीचे कळते.
साठलेलं दुःखही हृदयातले,
मैत्रीच्याच खांदांवर गळते.

आभाळ भरल्या ढगांसारखा,
कंठ त्याचा येतो दाटून.
बरसतो सर्वांगावर बेभान,
जसं आभाळ फाटलंय आतून.

क्षण ते त्याचे दुःखाचे,
वाहतात भार एकट्यानेच.
हिरवाईच्या गालीचावरही रक्त,
वाहते लाजरीच्या काट्यानेच.

(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 3 =