मळगाव येथे रविवारी सकल हिंदू संमेलन
हिंदू धर्म, संस्कृती आणि मूल्य संवर्धनासाठी विविध मान्यवरांचे मार्गदर्शन
सावंतवाडी
हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती आणि मूल्यांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने मळगाव येथील शालू मंगल कार्यालयात रविवारी, दि. ३१ मे रोजी सकल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनात प्रमुख मार्गदर्शक व वक्ते म्हणून डॉ. प्रवीणकुमार गणेशराव ठाकरे, अध्यक्ष सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष ह.भ.प. लक्ष्मण दत्ताराम कडव महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
संमेलनाचे संयोजन निवृत्त राजपत्रित अधिकारी ह.भ.प. शेखर मधुकर पाडगावकर यांनी केले आहे. हिंदू समाजातील ऐक्य, संस्कार आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन या विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या संमेलनास सर्व माता, भगिनी आणि बंधूंनी आपल्या कुटुंबीय व मित्रपरिवारासह पारंपरिक मंगल वेषात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदू संमेलन समन्वय समिती, मळगाव पंचक्रोशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
