You are currently viewing काय आहे आयुर्वेद

काय आहे आयुर्वेद

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश आंदोलन पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती, संस्थापक अध्यक्ष सांगली जिल्हा, श्री.अहमद मुंडे यांचा लेख

आपल्याला सर्वात मोठं वरदान लाभले आहे ते म्हणजे पृथ्वी कारण पृथ्वीवर पाणी.फळे. फुले. भाजीपाला. वेली. झाडें झुडपे. हे सर्व काहींना काही औषधी गुण घेऊन आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात आणि आहेत. पृथ्वी वरील प्रत्येक वस्तू मध्ये औषधी गुणधर्म आहेत पण आपणांस हे सर्व कळण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जावं लागणार आहे. त्याशिवाय कोणती वनस्पती त्याचे औषधी गुणधर्म काय याचं आपणास ज्ञान होणार नाही . पृथ्वीवरील माती सुध्दा औषधी आहे. प्रत्येक वनस्पती ची साल फुले फळे यामध्ये औषधी अनमोल ठेवा दडला आहे . त्याचा अभ्यास करून लोककल्याणासाठी त्याचा वापर कसा करता येईल हाच आपला प्रयत्न असण गरजेच आहे.
पूर्वी आज असणारे मोठें मोठें दवाखाने. हाॅसपिटल. लॅब विविध टेस्ट करणार्या मशिन नव्हत्या. एक्सरे. एम आय आर. अशा अत्याधुनिक डिजिटल मशिन उपलब्ध नव्हत्या मग त्यावेळी लोक शारीरिक मानसिक. अशा विविध शारीरिक व्याधीने आजारी पडत नव्हते काय ? वरील कोणतीही सेवा सुविधा नसून सुध्दा लोक शंभर वर्षे जगत होती. दात पडत नव्हते. केस लवकर पांढरे होत नव्हते. कॅन्सर. मधुमेह. साखर. बी पी. हार्ट अॅटक. डेंग्यू. मलेरिया. काविळ. हिवताप. अशा विविध शारीरिक व्याधीने लोक आजारी पडत नव्हती का? आणि माणूस आहे म्हणजे आजार आहेच. मग आपल्या समोर एक प्रश्न उभा राहतो की त्यावेळी लोकांच्या आजारांवर काय उपचार पद्धती वापरली जात होती. का उपचारा विना लोक मरत होती का ? विचार करावा लागेल . त्याकाळात सुध्दा अपघात होणे. भांडणं मारामाऱ्या. असे प्रकार घडतंच होतें. मग अशा अपघातात पायांचे.मानेचे . हातांचे .व अन्य कोणतेही हाड मोडलयास कुठली एक्सरे मशिन होती की त्यामुळे उपचार करणार्या व्यक्तिला कुठलं हाड कुठ मोडल आहे हे कसे कळत असेल . त्यासाठी कोणते प्लास्टर बंॅडेंज वापरल जात होतं. यातलं काही त्यावेळी उपलब्ध नव्हते मग त्यावेळी लोकांचे हाडाबाबत असणारे ज्ञान शंभर टक्के बरोबर होत. लोक व्यायाम सकस.आहार .दुध. तुप. दही. बाजरी. ज्वारी. गहू. भाजीपाला बिगर केमिकलचा. आणि मजबूत शारीरिक यष्टी मर्दानी खेळ. दांडपट्टा. तलवार बाजी .घोड स्वारी . शेतीची कामे . पैलवान. कुस्ती. यामुळे या लोकांना शरिरातील एकान एका हाडांचा अभ्यास होता . आत्ता एम आय आर. एक्सरे. विविध टेस्ट रिपोर्ट चुकीचं निघत आहेत. त्यामुळे रोगांचे निदान होत नाही त्यामुळे योग्य उपचार होत नाही. इंग्रजी औषधाने लोक विविध आजाराने आज पछाडलेली आहेत . लोकाचा वेळ आणि पैसा वाया जात आहे तो फक्त आणि फक्त निदान न होण्यामुळे कित्येक डॉ यांची विविध आॅपरेशन फेल झालेली आपण बघतो .काही वेळा रुग्ण मयत होतों. मयताला आॅकसिजन लावून पैसा उकळणारे महाभाग आज सुध्दा आपल्या आजूबाजूला आहेत .
आयुर्वेद म्हणजे झाडपाला कास्ट औषधी यांचे ज्ञान असणारी जाणकार व्यक्ती यांचें रोगांचे निदान कधीचं चुकीचं ठरतं नाही . पूर्वी हातांचे. पायांचे. माणेचे . मणक्याचे. व अन्य कोणतेही हाड मोडले अथवा निसटले तर त्याला विशिष्ट झाडपाला बांधून वर काठ्या बांधून ते हाड बरोबर परफेक्ट बसविले जात होतें . रुग्णांना औषधी झाडपाला व वेली . विविध फळे. यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जात असे . लोक आपल्या जखमेवर माती सुध्दा लावत होते. काहीजण आजही मातीने दात घासतात. पण विचार करावा लागेल की त्यावेळची माती स्वच्छ होती आज मातीत विविध खतादवारे विविध घातक केमिकल . मिसळल गेल आहे त्यामुळे सर्व निसर्गाचा खजिना अडचणीत आला आहे .
पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, जगातील सर्वात जुना ग्रंथ ऋग्वेद आहे . विविध धार्मिक विद्वानांनी त्याची रचना 5000 ते लाखो वर्षांपूर्वी मानली आहे. या संहितेतही आयुर्वेदाची अत्यंत महत्त्वाची तत्त्वे सर्वत्र विखुरलेली आहेत. चरक , सुश्रुत , कश्यप इत्यादी मान्य लेखक आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद मानतात . यावरून आयुर्वेदाची प्राचीनता सिद्ध होते.
धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता आहे. तो विष्णूचा अवतार मानला जातो .
परंपरेनुसार, आयुर्वेदाचे आदि आचार्य अश्विनी कुमार असल्याचे मानले जाते , ज्यांनी बकरीचे डोके दक्ष प्रजापतीच्या धडाशी जोडले होते. हे ज्ञान इंद्राला अश्विनीकुमारांकडून मिळाले. इंद्राने धन्वंतरीला शिकवले . काशीचा राजा दिवोदास हा धन्वंतरीचा अवतार असल्याचे म्हटले जाते. त्याच्याकडे जाऊन सुश्रुतने आयुर्वेदाचा अभ्यास केला. अत्रि आणि भारद्वाज हे देखील या शास्त्राचे प्रवर्तक मानले जातात. अश्विनीकुमार , धन्वंतरी , दिवोदास (काशिराज), नकुल , सहदेव , अर्की, च्यवन, हे आयुर्वेदाचे आचार्य आहेत .जनक , बुध, जावळ, जाजली , पायल, कर्ता , अगस्त्य , अत्री आणि त्यांचे सहा शिष्य ( अग्निवेश , भेडा, जातुकर्ण , पराशर , सिरपाणी , हरित ) , सुश्रुत आणि चरक.
आयुर्वेदाचा उगम सुधारणे
चरक शाळेनुसार (अत्रेय संप्रदाय)
चरक शाळेनुसार, आयुर्वेदाचे ज्ञान प्रथम ब्रह्माकडून प्रजापती, प्रजापती अश्विनीकुमारांकडून, इंद्राकडून आणि भारद्वाज इंद्राकडून मिळाले . च्यवन ऋषींचा कार्यकाळ देखील अश्विनीकुमारांच्या समकालीन मानला जातो. आयुर्वेदाच्या विकासात च्यवन ऋषींचे फार मोठे योगदान आहे. त्यानंतर भारद्वाज यांनी आयुर्वेदाच्या प्रभावाखाली दीर्घ, आनंदी आणि निरोगी जीवन प्राप्त केल्यानंतर इतर ऋषींमध्ये त्याचा प्रसार केला. त्यानंतर पुनर्वसु अत्रेयांनी अग्निवेश , भेळ, जातू, पराशर, हरित आणि क्षर्पणी या सहा शिष्यांना आयुर्वेदाचा उपदेश केला . या सहा शिष्यांपैकी सर्वात बुद्धिमान म्हणजे अग्निवेशत्यांनी प्रथम संहिता तयार केली – अग्निवेश तंत्र, जे नंतर चरकाने नाकारले आणि चरकसंहिता असे नाव दिले , जो आयुर्वेदाचा आधारस्तंभ आहे.
सुश्रुत (धन्वंतरी पंथ) नुसार
सुश्रुताच्या म्हणण्यानुसार, जेव्हा सुश्रुत इतर महर्षींसह काशीराज दिवोदासाच्या रूपात अवतार घेतलेल्या भगवान धन्वंतरीकडे गेले तेव्हा सुश्रुत आयुर्वेदाचा अभ्यास करण्यासाठी गेले आणि त्यांना लागू केले. त्या वेळी भगवान धन्वंतरींनी त्यांना उपदेश करताना सांगितले की, ब्रह्मदेवाने स्वतः प्रथम अथर्ववेदाचा उपवेद आयुर्वेद एक हजार अध्यायांमध्ये प्रकाशित केला – सृष्टीच्या निर्मितीपूर्वी लाखो श्लोक आणि पुन्हा मानवाला अदूरदर्शी समजून त्याचे विभाजन केले. आठ भागांमध्ये. अशाप्रकारे धन्वंतरीने आयुर्वेदाच्या प्रकाशनालाही ब्रह्मदेवाने प्रतिपादन केलेले मानले आहे. पुन्हा भगवान धन्वंतरी म्हणाले की ब्रह्मदेवाकडून प्रजापती दक्ष, अश्विनीकुमार द्वय त्यांच्याकडून आणि इंद्राने आयुर्वेदाचा अभ्यास केला
आज आयुर्वेदाचा बाजार काही बोगस डॉक्टर यांनी मांडला आहे . यांनी लोकांची अडचण ध्यानात घेऊन आणि पैसा मिळविण्याचे साधनं म्हणून आज आयुर्वेदाचा वापर करणारे बोगस डॉक्टर यांनी उत आला आहे . केरळीयन प़चक्रम . माॅलिश विविध तेलाने . विविध इंग्रजी औषध मिसळून तयार केलेली वेदना शामक औषधे वापरण्यास सुरुवात केली आहे. कारणं आज लोक विविध शारीरिक आजाराने ग्रासलेले आहेत. कोणाला साखर आहे.कोणाला बी पी आहे. कोणाला सांधे कंबर मणक्यांच्या आजार आहे. तर कोणाला वजन कमी करण्याचे वेड आहे. कोणाला. संतती प्राप्त करण्याचे कोड आहे. अशा एक नाही अनेक व्याधीने लोक ग्रासलेले आहेत . याचाच फायदा बोगस डॉक्टर आणि आयुर्वेद नाव पुढ करून पैसा मिळविणारे चोर आज गल्ली बोळात आपली अलिशान दुकान थाटून बसले आहेत.
आज आयुर्वेदाचा सुध्दा काही कंपन्या एजंट बोगस डॉक्टर यांनी उघड उघड बाजार मांडला आहे. औषध असतं इंग्रजी पण आयुर्वेदिक भासवून लोकांना फसवले जात आहे. सर्वच बोगस आहेत असं म्हणता येणार नाही. आजही आयुर्वेदाचा समाजसेवा करण्यासाठी विना मोबदला उपचार करणारे देव दूत आजही समाजात आहेत. त्यातले काहीजण हातांचा गुण म्हणता येईल असा उपचार करत आहेत. तर बोगस आयुर्वेदिक डॉक्टर प्रत्येक रुग्णांकडून मनमानी दराने फी वसूल करत आहेत. समजा एका पेशंटसाठी ५०० रूपये धरले तर रोज रोज शंभर पेशंटला फसवणारा रोज किती पैसे मिळवत असेल याचा अंदाज आहे कां? आज एकाबाजूला औषधांचे अमाप दर लावून लुटत आहेत. डॉ आपले खिसे जीवंत काय मयत रुग्णांकडून सुध्दा बेमाफी रुग्ण फी वसूल करत आहेत. मेडिकल मालक डॉ यांना पेशंट माग औषधांच्या दरानुसार कमिशन देत आहेत दर रोज कमिशन दवाखान्यात पोहच केलें जात आहेत. त्यामुळे डॉ आपल्याच मेडिकल मधून औषध खरेदी करण्याचें पेशंट वर लादत आहेत त्यामुळे पेशंटची दोन्ही कडून लुट होत आहे.
दिनचर्या बदला सकाळी लवकर उठा व्यायाम करा. फिरणे पोहणे. सायकल चालवणे. पळणे. थोड पण आरोग्यासाठी चांगले असल येवढेच खा. फळें पालेभाज्या कडधान्ये अंडी. दुध पाणी भरपूर प्या यांचे सेवन करा आरोग्य चांगलें ठेवा आणि डॉ मग तो आयुर्वेदिक असो वा इंग्रजी औषध देणारा आपणांस लुटणार दोघंही त्यामुळे “” तुझं आहे तुझ पासी पण तु जागा चुकलाशी “” असा प्रकार होणारं आणि आपले सर्व धन हे दोन्ही चोर लुटणार हे खरंच आहे ‌.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =