You are currently viewing घ्या समजून राजे हो…
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

घ्या समजून राजे हो…

घ्या समजून राजे हो…

*संघ आणि भाजपवर उद्धवपंत ठाकरेंनी केलेल्या निरर्थक आरोपांमागचे वास्तव…* – अविनाश पाठक यांचे मनोगत

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: रविवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी मुंबईत समाजवादी पक्षाचे वेगवेगळे गट आणि शिवसेना यांच्या नेत्यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे म्हणाले की देशाचा स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि आणिबाणीविरुद्धचा संघर्ष यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठेही नव्हता. मात्र समाजवादी पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते हे सर्वच आंदोलनांमध्ये सक्रिय होते असा दावा त्यांनी केला.

जून २०२२ मध्ये सत्ता गेल्यापासून उद्धवपंत ठाकरे हे काहीसे भान सोडूनच वागत आहेत हे गतवर्षभरात महाराष्ट्राने अनेकदा अनुभवले आहे. त्यांचे हे भाषण हे असेच भान सोडून बेभान बोलणे असेच म्हणावे लागते.

उद्धव ठाकरेंच्या या भाषणात त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर देण्यासाठी मी काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भारतीय जनता पक्ष यांचा पदाधिकारी किंवा प्रवक्त्या नाही. मात्र एक पत्रकार आणि राजकीय विश्लेषक या नात्याने माझ्याकडे उपलब्ध असलेली माहिती इतरांपर्यंत पोहचवणे हे कर्तव्य पार पाडण्यासाठी मी हा लेख लिहितो आहे..

स्वातंत्र्यलढ्यात संघाचा कधीच सहभाग नव्हता हा संघविरोधकांचा जुनाच आरोप आहे. याला अनेकदा उत्तरही दिली आहेत. मीच स्वतः 2020 मध्ये स्वातंत्र्यदिनानंतर लगेचच या आरोपाला उत्तर देणारा लेख लिहिला होता. तो त्यावेळी दैनिक श्रमिक एकजूट, दैनिक गावकरी, दैनिक बित्तमबातमी आदींनी प्रकाशितही केला होता. स्वातंत्र्यलढ्यात संघ नव्हता असे म्हटले तर जंगल सत्याग्रहात डॉक्टर हेडगेवार यांनीच पुढाकार घेऊन यवतमाळ जिल्ह्यात सत्याग्रह घडवून आणला होता. १९२९ च्या एका संघ शिबिरात उपस्थित स्वयंसेवकांनी स्वातंत्र्यलढ्यात झोकून देण्याची शपथही घेतली होती. १९४२ च्या चलेजाव आंदोलनातही संघ मोठ्या प्रमाणात सक्रिय होता, याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत. त्यामुळे हा आरोप म्हणजे उद्धवपंतांनी शिळ्या कढीला उत आणण्यासारखाच ठरतो.

आणीबाणीत संघर्ष करण्यासाठी संघ नव्हता, तर मग शिवसेना आली होती काय, याचे उत्तरही उद्धवपंतांनी द्यायला हवे. माझ्या माहितीनुसार त्यावेळी शिवसेनेचे तत्कालीन प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीला पाठिंबा जाहीर केला होता. संघाने मात्र आणिबाणीला विरोध करत आणीबाणीविरुद्ध शेवटपर्यंत संघर्ष केला होता. आणीबाणी जाहीर झाल्यावर पुढल्या चार दिवसातच संघावर बंदी आणली गेली. त्यापूर्वीच म्हणजे आणिबाणी लागल्याच्या तिसऱ्या दिवशीच संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांना अटक करण्यात आली होती. त्यांना नागपुरात अटक करून विमानाने मुंबईला नेण्यात आले, आणि तेथून नाशिकच्या तुरुंगात आणण्यात आले होते. संघावर बंदी घातल्यावर लगेचच संघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी शोधून तत्कालीन सरकारने तुरुंगात डांबले होते. त्यात काही मोजके लोक भूमीगतही झाले. संघबंदीच्या काळात काही प्रमुख संघ अधिकारी तुरुंगातच मृत्युमुखीही पडले होते.

संघावर बंदी घातल्यानंतर शासकीय नियमांचे पालन करण्यासाठी दैनंदिन संघ शाखा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र तरीही संघ स्वयंसेवकांचा परस्परांशी संपर्क होताच. आणीबाणीविरोधात ज्यावेळी सत्याग्रह सुरू झाला त्यावेळी संघ स्वयंसेवक आघाडीवर होते. मला मिळालेल्या आकडेवारीनुसार दोन लाखाहून अधिक स्वयंसेवकांनी आणीबाणी विरोधात सत्याग्रह करून तुरुंगवास पत्करला होता. त्यावेळी विविध प्रकारांनी सत्याग्रह करून प्रशासनाला जेरीस आणले गेले होते.

सत्याग्रह करणारे दोन लाखावर अधिक स्वयंसेवक होते. त्याचवेळी देशभरात एक लाखाहून अधिक संघ अधिकारी आणि स्वयंसेवक मिसाबंदी म्हणून विविध तुरुंगांमध्ये तुरुंगवास भोगत होते. या तुरुंगवास भोगणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये विविध शासकीय कार्यालयांमध्ये नोकरी करणारे कर्मचारी देखील होते. त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या होत्या. अनेकांच्या घरी दरमहा पगार पोहोचणे बंद झाले होते. त्यांची कुटुंबे जवळजवळ निराधार झाली होती म्हटल्यास वावगे ठरू नये. या काळात संघाच्या भूमिगत अधिकारी आणि प्रचारकांनी जे स्वयंसेवक सत्याग्रहात गेले नव्हते त्यांनाही कामाला लावले होते. देशभरात लाखो तुरुंगाबाहेर असलेले स्वयंसेवक त्या काळात सक्रिय झाले होते. हे स्वयंसेवक तुरुंगात असलेल्या संघ स्वयंसेवकांच्या परिवारांना नियमित भेटून आधार देण्याचे काम करत होते. या स्वयंसेवकांनी इतरांकडून मदत गोळा करून तुरुंगात असलेल्या स्वयंसेवकांच्या परिवारांच्या तोंडचा घास तुटू दिला नाही.इतकेच काय पण त्या परिवारातील सदस्यांची दुखणी खुपणी औषधपाणी यांचीही काळजी घेतली होती.परिणामी तुरुंगात असलेल्या स्वयंसेवक आणि त्यांचे परिवार यांचे मनोधैर्य कायम राहिले होते.

याच काळात संघाचे अनेक स्वयंसेवक समाजात फिरून छुपी जनजागृती करण्याचेही काम नियमित स्तरावर करत होते. या काळात सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आणि शासकीय यंत्रणा यांनी अनेक ठिकाणी अतिरेकी वर्तनही केले नसबंदीच्या अतिरेकी जबरदस्ती मुळे काही व्यक्तींचे आयुष्य बरबाद होण्याची वेळ आली होती. अशांना आधार देण्याचे कामही संघ स्वयंसेवक करत होतेच.

संघ स्वयंसेवकांनी या काळात केलेले महत्त्वाचे काम म्हणजे छुपी जनजागृती, या काळात वृत्तपत्रांवर बंधने आली होती. वृत्तपत्रात येणारी प्रत्येक बातमी आधी पोलिस अधिकारी तपासून घेत होते. त्यामुळे सरकारविरोधातील कोणतीही बातमी जनसामान्यांपर्यंत पोहोचत नव्हती. अशावेळी तोंडोतोंडी बातम्या पोहोचवण्याचे काम या स्वयंसेवकांनी केले होते. याच काळात सायकलोस्टाइलवर किंवा रोटा प्रिंटर वर छोटी छोटी पत्रके काढून रातोरात लोकांच्या घरी वाटून येणे आणि वास्तव काय ते लोकांपर्यंत पोहोचवणे हे काम या स्वयंसेवकांनी केले. परिणामी जनजागृती होत राहिली. जानेवारी १९७७ मध्ये इंदिरा गांधींनी अचानक आणीबाणी शिथिल केली आणि लगेचच निवडणुका जाहीर केल्या. विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना तुरुंगातून सोडल्यावर बाहेर येऊन प्रचार करायला फार थोडा वेळ मिळाला. मात्र यावेळी आणीबाणीच्या १८ महिन्यात तुरुंगाबाहेर असलेल्या लाखो संघ स्वयंसेवकांनी केलेल्या छुप्या प्रचाराची मोठी मदत झाली. जेमतेम दीड महिन्याच्या प्रचारात काँग्रेसचा दारुण पराभव करत जनता पक्ष निर्भेळ बहुमताने विजयी झाला होता. ही सर्व तुरुंगाबाहेर असलेल्या संघ स्वयंसेवकांचीच कामगिरी होती.

या काळात देशभरातील तुरुंगांमध्ये असलेल्या राजबंदी यांची आकडेवारी पाहिली तर राजबंदी असलेल्यापैकी ९०% हून अधिक हे संघ स्वयंसेवक होते, तर समाजवादी किंवा सर्वोदयवादी किंवा इतर हे जेमतेम पाच ते दहा टक्के इतकेच होते. संघ कार्यकर्ते असलेल्यांशिवाय इतरही राजबंदी परिवारांना आधार देण्याचे काम हे तुरुंगाबाहेर असलेले स्वयंसेवक करत होते.

आणीबाणीचा इतिहास तपासल्यास वर दिलेले सर्व संदर्भ त्यात सापडतील आणि त्याची सत्यासत्यता पडताळून बघता येईल. अधिक स्पष्ट करून सांगायचे झाल्यास दिल्लीच्या सुरुची प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेले आपत्कालीन संघर्षगाथा हे पुस्तक उद्धवपंत ठाकरे यांनी जरूर वाचावे. या पुस्तकात आणीबाणीतील विरोधी पक्षांच्या संघर्षाची सविस्तर माहिती दिलेली आहे.

अशावेळी आणीबाणी विरुद्धच्या लढ्यात संघ कुठेच नव्हता मात्र समाजवाद्यांनीच संघर्ष केला हा उद्धव पंतांचा दावा म्हणजे २१व्या शतकातला बाष्कळ विनोद ठरतो.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत संघ कुठेच नव्हता हा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. संघाने कायम राष्ट्रीय समस्या डोळ्यासमोर ठेवूनच काम केले आहे. भाषावार प्रांतरचना किंवा नव्या प्रांताचे गठन असे मुद्दे घेऊन संघ कधीच सक्रीय नव्हता. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, वेगळा विदर्भ, तेलंगणा, हरियाणा, छत्तीसगड अशा कोणत्याही आंदोलनात संघ कधीच नव्हता.

उद्धवपंतांनी आपल्या भाषणात आणखी एक विधान केले आहे. त्यानुसार ते म्हणतात की भारतीय जनता पक्ष हा कधीच कोणाला वाढू देत नाही. म्हणूनच शिवसेना भाजपपासून वेगळी झाली, असा दावाही उद्धवपंतांनी केला आहे. हा आरोप थोड्या वेगळ्या पद्धतीने शिवसेना वेळोवेळी करत आली आहे. त्यांचा दावा आहे की महाराष्ट्रात भाजपचे कुठेही अस्तित्व नव्हते, त्यावेळी शिवसेनेने भाजपशी युती केली आणि शिवसेनेच्या जोरावर भाजप वाढला. पण शिवसेनेला बाजूला करून भाजप पुढे निघून गेला. उद्धवपंतांचा हा दावाही निरर्थकच म्हणावा लागेल. शिवसेनेची स्थापना १९६६ साली झाली, तर भाजप या पक्षाचे मूळ रूप असलेल्या भारतीय जनसंघाची स्थापना १९५२ सालीच झाली होती. ज्या काळात शिवसेना मुंबईत जोर मारू बघत होती, त्या काळात चंद्रपूर, गोंदिया पासून तर कोकणात रत्नागिरी पर्यंत भारतीय जनसंघ पोहोचला होता. कोकणातले नातू आणि विदर्भातले देशकर, मानकर हे त्या काळात विधानसभा आणि लोकसभेत पोहोचले होते. ज्यावेळी शिवसेना आणि भाजपची युती झाली त्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेचा एकही आमदार नव्हता. मात्र भाजपचे आमदार लक्षणीय संख्येत होते. असे असतानाही युती करताना दादागिरी करून महाराष्ट्रात आम्ही मोठा भाऊ असे धोरण स्वीकारले आणि भाजपच्या ११८ तर शिवसेनेच्या १७० अशा जागा लढवल्या गेल्या. जास्त जागा लढवल्यामुळे शिवसेनेचे जास्त आमदार निवडून येणे यात काहीही नवल नव्हते. त्याचा फायदा घेत युतीचे सरकार आले तेव्हा शिवसेनेने मुख्यमंत्रीपद घेतले होते. १९९५ पर्यंत ही परिस्थिती होती १९९९ पासून शिवसेनेच्या आमदार निवडून येण्याची घसरण सुरू झाली. ही २००४ मध्येही सुरू राहिली, आणि २००९ मध्ये तर जास्त जागा लढवूनही शिवसेनेचे कमी आमदार निवडून आले. परिणामी जास्त जागा असलेल्या भाजपकडे विरोधी पक्षनेते पद गेले होते. हा इतिहासही महाराष्ट्र अजून विसरला नाही.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने यावेळी जागा वाढवून द्याव्या अशी मागणी केली, तेव्हा शिवसेनेने स्पष्ट शब्दात नकार दिला होता. परिणामी युती तुटली. ही तुटण्याला कारणही शिवसेनेचा अडेलतट्टूपणाच होता. ऐनवेळी युती तुटल्यावरही भाजपने सर्व जागा स्वबळावर निवडणूक लढवल्या आणि २८८ पैकी १२२ जागांवर विजय मिळवला. त्यावेळी शिवसेनेला जेमतेम ६२ जागा मिळवता आल्या होत्या. आपली ताकद न ओळखता आकारण हट्टीपणा करून शिवसेनेने युती तोडण्याची वेळ आणली होती. २०१९ मध्ये तर काय झाले हा इतिहास ताजा आहे. तरीही भाजपने युती तोडली आणि भाजप मित्र पक्षांना दूर सारतो आणि आपल्या पोळीवर तूप ओढून घेतो हा आरोप निरर्थकच तर ठरतोच पण शिवसेना किती कांगावेखोरपणा करते आहे हे देखील दिसून येते.

उद्धवपंतांचे हे दोन्ही आरोप बघता हातून सत्ता गेल्यामुळे मानसिक संतुलन बिघडल्यावर माणूस जसा बेभान होऊन कोणतेही आरोप करतो तसाच हा प्रकार दिसतो. ताळतंत्र सोडून हे उद्धवपंत आणि त्यांचे सहकारी आरोप करत सुटले आहेत. मात्र महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे. उद्धवपंतांनी कसेही आणि कितीही आरोप केले तरी ते वास्तव जाणूनच आपले निर्णय घेणार आहेत याबद्दल कोणाच्याही मनात शंका नसावी. मात्र असे निरर्थक आरोप केल्याने उद्धव ठाकरे हास्यास्पद ठरू शकतात हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे..

वाचकहो.. पटतंय का तुम्हाला हे…?

त्यासाठी आधी समजून तर घ्या राजे हो….!

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा