You are currently viewing जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत आर्या राणे प्रथम; कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत आर्या राणे प्रथम; कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत आर्या राणे प्रथम; कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड

प्राथमिक शाळा सुतारवाडीच्या विद्यार्थिनीचे घवघवीत यश; अजित नाडकर्णी यांच्याकडून कौतुक, प्रशिक्षकांसह वडिलांच्या मेहनतीचाही गौरव

सिंधुदुर्ग

प्राथमिक शाळा सुतारवाडी येथील विद्यार्थिनी आर्या विश्वनाथ राणे हिने २२ जुलै रोजी झालेल्या जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या शानदार कामगिरीमुळे तिची कोल्हापूर विभागीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
आर्याच्या या यशाबद्दल अजित नाडकर्णी यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी आर्याचे वडील विश्वनाथ राणे यांचेही विशेष अभिनंदन केले. मुलीच्या यशामागे त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा आणि प्रोत्साहनाचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.
दररोज नियमितपणे प्रशिक्षणासाठी आर्याला घेऊन जाणे, तिच्या सरावासाठी वेळ देणे आणि तिला सतत प्रेरणा देणे, या पालकांच्या समर्पणामुळेच आर्याला हे यश मिळाल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले. आर्याच्या या यशामुळे शाळा, कुटुंब आणि परिसरात आनंदाचे वातावरण असून, विभागीय स्पर्धेतही ती उत्तम यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा