सावंतवाडीत राष्ट्रीय बालिका दिन साजरा..

सावंतवाडीत राष्ट्रीय बालिका दिन साजरा..

सावंतवाडी

शहरातील माठेवाडा येथील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील अंगणवाडी क्र. ६६ मध्ये राष्ट्रीय बालिका दिन आज रविवारी साजरा करण्यात आला.

यावेळी अंगणवाडीच्या परिसरामध्ये तीन वर्षीय बालिकांनी वृक्षारोपण केेले. झाडांचे महत्त्व आणि त्यांचे संगोपन याबद्दलची माहिती देण्यात आली. यावेळी माजी पंतप्रधान प्रियदर्शनी स्व.इंदिरा गांधी यांच्याबद्दल माहिती देण्यात आली. २४ जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन देशभरामध्ये साजरा केला जातो. याच दिवशी १९६६ साली भारताची पहिली महिला प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पालक वर्ग सौ. प्रांजल मेस्त्री, अंगणवाडी सेविका अनुराधा पवार, मदतनीस अमिषा सासोलकर, तसेच छोट्या बालिका कु.माही नूर शेख, करीमा सावंत, शुभांगी मेस्त्री सहभागी झाल्या होत्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा वापर करून बालिका दिन साजरा करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा