You are currently viewing तो आहे अंतरात

तो आहे अंतरात

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

*तो आहे अंतरात*

मी तसा व्रतवैकल्याच्या निमित्ताने, विशिष्ट परंपरा म्हणून, अथवा एखादा खास वार धरून आजपर्यंत कधीही उपास केलेला नाही. मला रांगेत उभे रहायला, अथवा गर्दीच्या ठिकाणी जायला आवडत नाही. त्यामुळे जत्रेत, यात्रेत, प्रसिद्ध देवस्थाने या ठिकाणी मी फारशी कधी धार्मिक भावनेने सामील होत नाही किंवा कोणी सांगितले म्हणून, वा “हे केले नाहीस आजच्या दिवशी तर मोक्ष मिळणारच नाही तुला.नरकातच जाशील.” वगैरे नियमांवर, कल्पनांवर माझा विश्वास बसत नाही. मुळात पाप पुण्याच्या रूढार्थाने ज्या कल्पना आहेत त्या मी मनाशी कधी बाळगल्याच नाहीत. कदाचित त्याला दोन कारणे असतील. एक तर —अशा काही अवघड अटी मान्य करून त्या चिकाटीने पूर्णत्वास नेणे मला जमत नाही आणि दुसरे म्हणजे मला त्याची बुद्धीला पटणारी तार्किक, सुसंगत अशी कारणे न सापडल्यामुळे मी त्यांचा आजपर्यंत गंभीरपणे विचारच केला नाही आणि केवळ आजूबाजूचे लोक पिढ्यानुपिढ्या… अर्थात या लोकांमध्ये आपलेही कुटुंबीय, सखे सोयरे, हे सारे अत्यंत श्रद्धेने म्हणा किंवा काहीसं परंपरेचे भय मनात असल्यामुळे म्हणा— करत असताना आपणही ते करायलाच हवं असं मला कधी वाटलंच नाही.

पण तरीही मी नास्तिक नाही. मी देव या संकल्पनेला नक्कीच मानते. मी त्या अदृश्य देवाला नमस्कार करते. मला जर कधी उदास ,अस्वस्थ, नकारात्मक वाटले तर मी मंदिरातही जाते. नाहीतर नुसतीच गॅलरीत, झोपाळ्यावर बसून मोकळ्या आकाशाकडे पाहते. कधी हवेत चालणारे कापसासारखे ढग, नाहीतर सांजवेळी बुडणारा सूर्य किंवा रात्रीचे तारे पाहत बसते. कुठेतरी अंत: प्रवाहात मला जाणवते की कुणीतरी माझं आहे. मला प्रेरणा देणारं, जीवन जगण्याची स्फूर्ती देणारं, असं तत्व माझ्या अंतरातच आहे. त्या तत्त्वाला ईश्वर म्हणायचं का? ते माहित नाही. पण एक शक्ती मात्र नक्कीच आहे.

शिवाय मी नास्तिक नाही, मी ईश्वराचे अस्तित्व मानते याला आणखी काही पुरावे नक्कीच आहेत. खूप वेळा मी म्हणते,
देवा! का रे बाबा माझी इतकी परीक्षा पाहतोस?”
” देवा! सोडव रे यातून मला.”
” देवा! मी आजपर्यंत तुझ्याकडे काही मागितले नाही, आज तरी माझं इतकं मागणं करशील का पुरं?”
“देवा! माझ्याच बाबतीत असं नेहमी का घडावं?” अगदी कारणे, प्रसंग किरकोळही असतील पण प्रत्यक्षपणे ही वाक्यं अनेकदा माझ्या तोंडातून निसटलेली आहेतच. अगदी उपवासासारखे संपरुपी शस्त्र घेऊन देवापुढे धरणं वगैरे धरून बसले नाही, त्याला कसली नवसरुपी लालुच दाखवली नाही तरी अशा कुठल्यातरी काल्पनिक, आभासी, सगुण अथवा निर्गुण आकृतीशी माझे भावनिक संवाद होतच असतात. आणि याच आकृतीला मी देव अशी संज्ञा देते.

बाकी देव म्हणजे नक्की काय ?, आस्तिक्यवाद, ईश्वरवाद वगैरे क्लिष्ट तत्त्वज्ञानात मी सामान्य बुद्धीची, पामर व्यक्ती डुबत नाही.

लहानपणी मॉरल सायन्स मध्ये शिकलेले,” GOD IS EVERYWHERE” हे एकच वाक्य माझ्या मेंदूत पक्कं चिकटलेलं आहे. साऱ्या चराचरात, कीडा मुंगीतही देव आहे हे मी वाचलेले आहे . तसेच “जनसेवा हीच ईश्वरसेवा, भूतदया हाच खरा धर्म, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला” वगैरे पाठ्यपुस्तकातली अनेक साधीसुधी धर्मसूत्रं मी कळत नकळत बाळपणापासून वेचत आलेली आहे. नंतर पुढच्या आयुष्यात भगवद्गीता आली. कर्मयोग, भक्तीयोग थोडा थोडा झिरपतही गेला. संतांनी तर साध्या साध्या शब्दात ईश्वर या संकल्पनेचा आविष्कार घडवला.

। चित्त शुद्ध तरी ।
।शत्रु मित्र होती।
।व्याघ्रही न खाती सर्प तया।।

म्हणजेच चित्तशुद्धी आणि ईश्वरीय वास याचं कुठेतरी समीकरण मनात जुळत गेलं आणि आपोआपच आंतरिक, आत्मिक ईश्वरी शक्तीशी ओळख व्हायला लागली आणि मग देवदर्शनाचा, शारीरिक हठयोगाचा, नैमित्यिक रितीभातींचा अट्टाहास संपला. ईश्वर आपल्या अंतरातच
आहे आणि त्यालाच ओळखणं, जपणं याची जाणीव व्हायला लागली. ते अधिक पटू लागलं.

माझी एक अत्यंत धार्मिक वृत्तीची आणि श्रद्धाळु, परंपराळू (हा माझा शब्द ) मैत्रीण मला म्हणाली होती,

“। कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी काशी।
। हृदयातील भगवंत राहिला हृदयातच उपाशी।। ही अशी लिरिक्स ना तू तुझ्या सोयीप्रमाणे जवळ करतेस. कारण तू आळशी आहेस. तुझ्यासारख्या लोकांना ईश्वर शोधण्यासाठी, देवदर्शनासाठी करावी लागणारी पायपीट मेहनत, टाळायची असते. म्हणून हे असं सोप्पं तत्वज्ञान बरं असतं. तुला माहिती आहे, मी दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जाते .”

(आणि घरी येऊन सुनेशी भांडतेस )हे मात्र मी माझ्या मनाच्या कंसात बोलले बरं कां?

पण मैत्रिणीच्या या आरोपामुळे मी मात्र चलबिचल झालेच होते. पुन्हां पुन्हां स्वतःला तपासून पाहिले. पण नाही. काही बाबतीत मी ठामच होते. म्हणजे पंढरपूरची वारी याविषयी मला प्रचंड आस्था आहे, आपुलकी आहे, त्या सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांना मी आदरपूर्वक सलाम करते. पण तरीही “मी दरवर्षी वारी करते” या उच्च गुणांच्या समूहातील मी नाही होऊ शकत. का? कारण “इथेच माझे पंढरपुर” हे तत्व मला अधिक भावते. पृथ्वीप्रदक्षिणा न करता आईलाच प्रदक्षिणा घालणारा बालगणेश मला खरोखरच आवडतो. शबरीची उष्टी बोरे खाणारा देव,तुळशीच्या फक्त एका पानाने तुला तोलणारा देव,नाम्याची खीर खाणारा देव मला अधिक माझा, अंतरातला,हृदयस्थ वाटतो.

देवा! तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो ..
अशी असते माझ्या अंतरातली देवाची स्तुती. चांदण्या, चंद्र, झाडे, पाखरे ,फुले, वेली, नद्या, झरे, पर्वत यांचे सौंदर्य पाहताना म्हणावेसे वाटते,
इतके सुंदर जग तुझे जर
किती सुंदर तू असशील…

खरोखरच या साऱ्यांमध्ये मला अगदी सहजच देवदर्शन होते. माझा मनीचा स्वर्ग इथेच मला मिळतो .माझं अंतर्मन या सगळ्यांशी जेव्हा मनोभावे कनेक्ट होतं ना तेव्हा मला ईश्वराची थेट भेट झाल्यासारखा अनुभव येतो. आणि ,
।शोधीशी मानवा। राउळी मंदिरी ।नांदतो देव हा आपल्या अंतरी।। हे आणि हेच जाणवते .

तुकडोजी महाराजांच्या,
देव आपुले अंतरी। आम्ही जातो तीर्थावरी।
देव आम्हासी पाहतो। आम्ही धोंडोबा पूजतो।
देवा आम्ही प्रकाशितो। आम्ही अंधारी राहतो।
तुकड्या म्हणे कैसे फळे। जोवर अज्ञान ना टळे।।

या वक्तव्यांशी मी मग पूर्णपणे तादात्म्य पावते..

“भाव तेथे देव” हे एक निरंतर सत्य आहे. प्रेम, कृतज्ञता, पूज्य भाव, शरणागती हे अंतरातूनच वाहणारे भाव आहेत. आणि या भावांपाशी असलेली दृढता म्हणजेच परमेश्वर प्राप्तीची वाट असे माझे स्पष्ट मत आहे.

संतांनी म्हटलेलेच आहे
।आमुची विश्रांती ।तुमचे चरण कमळापती। हेच एक जाणे।।
काया, वाचा मने या भावावस्थेतूनच सुख, स्थैर्य ,निर्भयता आणि विश्राम (मनःशांती) प्राप्त होते.
” तुझे मन माझे झाले, माझे मन तुझे झाले” अशी एक अद्वैतावस्था झाल्याचा अनुभव येतो आणि तो अंतरी असलेल्या ईश्वरी अंशाकडूनच मिळतो. आपलेच अंतरंग आपणची जाणावे ही संतांचीच शिकवण आहे. “अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे “हे एकदा मनावर पक्कं बिंबलं की ईश्वर प्राप्तीच्या शोधासाठी भटकणाऱ्या जीवांना म्हणावेसे वाटते ,
“तुझे आहे तुजपाशी परी जागा चुकलासी…”

हा लेख लिहीत असताना मी एक साधी, संसारी, प्रपंचात रमणारी, पापभीरू आणि निर्वीघ्नपणे आपली जीवननौका पार व्हावी म्हणून यथाशक्ती परमेश्वर कृपेचा वरदहस्त असावा म्हणून आराधना करणारी आणि आपल्या हातून कोणाचे चांगले झाले नाही तरी वाईट होऊ नये अशी इच्छा बाळगून जगणारी एक अत्यंत सामान्य मनुष्य व्यक्ती आहे.

संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले, संत तुकारामांच्या बुडवलेल्या गाथा इंद्रायणी नदीने तारल्या, संत एकनाथांना प्रत्यक्ष दत्त दर्शन झाले.
। दत्त येऊनि या उभा ठाकला ।
।जन्म मरणाचा फेरा चुकविला।।
हे अलौकिक त्यांच्या बाबतीत घडले. या साऱ्या संस्कार कथा जरी माझ्या जीवनाचा एक मुख्य भाग असल्या तरी “नराचा नारायण” होण्याची माझी पात्रता नाही याची मला पूर्ण जाणीव आहे पण तरीही माझ्या अंतरातलं काहीतरी अस्सल जपण्याचा माझा बुद्धिवादी प्रयत्न हीच माझी त्या ब्रह्मस्वरूपाशी मिळून जाण्याची खटपट आहे.अंतरात नांदत असलेल्या प्रभुला जाणण्याचा प्रयत्न आहे.

राधिका भांडारकर पुणे.

 

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा