You are currently viewing पिकूळेतील “त्या” रस्त्यासाठी ग्रामस्थानचे ठिय्या आंदोलन

पिकूळेतील “त्या” रस्त्यासाठी ग्रामस्थानचे ठिय्या आंदोलन

दोडामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या पायऱ्या वर सुरू आहे ठिय्या

दोडामार्ग

पिकुळे वखारी कडून ते देऊळवाडी पर्यंत रस्ता हा अपूर्ण आहे सदर ठेकेदाराने हा रस्ता बीबीम टाकून तसाच ठेवला आहे, याविषयी ग्रामस्थांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकामला कल्पना देवूनही ठेकेदार हे काम पूर्ण करत नाही यासाठी आज पिकुळे येथील युवक व ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले.

दोडामार्ग तालुक्यातील पिकुळे गावातील वखार ते देऊळवाडी हा रस्ता शासनाकडून संबधित ठेकेदाराने केला मात्र तो पूर्ण न करता फक्त त्यावर बीबीएम टाकले आहे रस्त्याचे बाकी काम अपूर्ण आहे, यामुळे या रस्त्यावरून ये जा करताना वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो मात्र याकडे संबंधित ठेकेदार व बांधकाम विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत, ठेकेदार तर बांधकाम विभागाचा जावई असल्यासारखा वागत आहे याची चिढ वाहन चालकांच्या मनात होती त्यामुळे त्यांनी हा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेत आज बांधकाम विभाग दोडामार्ग कार्यालयाच्या पायऱ्यावर बसून ठिय्या आंदोलन केले. अखेर ठेकेदाराने लवकरच हा रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा ठिय्या मागे घेण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − eighteen =