You are currently viewing आचिर्णे धनगरवाडा येथे वीज अंगावर पडून महिलेचा मृत्यू…

आचिर्णे धनगरवाडा येथे वीज अंगावर पडून महिलेचा मृत्यू…

वैभववाडी

तालुक्यातील आचिर्णे धनगरवाडा येथील महिलेच्या अंगावर वीज पडून महिलेचा जागीच मृत्यू झाला. लक्ष्मी राजाराम शिंगाडे वय ४५ वर्षे रा.आचिर्णे, धनगरवाडा असे मृत महिलेचे नाव आहे.

वैभववाडी तालुक्यात सोमवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. आचिर्णे धनगरवाडा येथील लक्ष्मी राजाराम शिंगाडे आपल्या जनावरांना घेऊन घराकडे येत होत्या. त्याच दरम्यान लक्ष्मी यांच्या अंगावर वीज कोसळून त्यात लक्ष्मी जागीच मृत झाल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा