You are currently viewing किल्ले सिंधुदुर्गचा ३५६ वा वर्धापनदिन उत्साहात…

किल्ले सिंधुदुर्गचा ३५६ वा वर्धापनदिन उत्साहात…

मालवण

येथील किल्ले सिंधुदुर्गचा वर्धापन दिन आज किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीतर्फे साजरा करण्यात आला. यानिमित्त मोरयाचा धोंडा येथे गणेश पूजन व किल्ले सिंधुदुर्गात शिवराजेश्वर मंदिरात पूजाअर्चा करण्यात आली.
किल्ले सिंधुदुर्गच्या वर्धापन दिनानिमित्त किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीतर्फे आज सकाळी ८ वाजता मोरयाचा धोंडा येथे प्रा. डॉ. रामचंद्र काटकर यांच्या हस्ते मोरेश्वराचे पूजन करण्यात आले. पौराहित्य रविकिरण आपटे यांनी केले. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पूजा अर्चा करून तसेच शिवप्रार्थना म्हणण्यात आली. यावेळी जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी प्रा. ज्योती तोरसकर यांनी ताराराणी यांचे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील वास्तव्य, त्यांनी केलेले कार्य याबाबत माहिती दिली. गडकिल्ल्यांची स्वच्छता करण्यासाठी योगदान देणाऱ्या स्वराज्य कार्य टीम, जनसेवा प्रतिष्ठान, स्वराज्य वस्तीष्ठ संघ, लायन्स क्लब या संस्थांच्या प्रतिनिधींचा यावेळी प्रेरणोत्सव समितीतर्फ सत्कार करण्यात आला.
यावेळी किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, उपाध्यक्ष सौ. ज्योती तोरसकर, केनवडेकर, भाऊ सामंत, रामचंद्र (दत्ता) नेरकर, गणेश कुशे, विकी तोरसकर, प्रदीप वेंगुर्लेकर, रत्नाकर कोळंबकर, डॉ. संजीव लिंगवत, संजना मांजरेकर, प्रसाद सरकारे, लकी कांबळी, आशिष राऊळ यांसह शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 2 =