You are currently viewing कणकवलीत आयुष्यमान भारत योजनेचा विशेष लाभ मिळणार

कणकवलीत आयुष्यमान भारत योजनेचा विशेष लाभ मिळणार

आम.नितेश राणे यांचा पुढाकार;कणकवली प.स. येथे उद्यापासून नोंदणी

कणकवली

आम.नितेश राणे यांच्या पुढाकाराने कणकवली विधानसभा मतदार संघातील जनतेला केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेचा विशेष लाभ मिळणार आहे.या योजनेची सुरवात कणकवली तालुकयात 5 ऑक्टोबर 2021 राजी स .11.00 वा पासून कणकवली पंचायत समितीच्या मागील बाजूस असणाऱ्या इंदीरा आवास योजनेच्या डेमो हाऊसच्या इमारतीमध्ये होणार आहे .

या योजनेचा लाभ कणकवली तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा व यासाठी येताना पात्र लाभार्थी यांनी आपले रेशनकार्ड व आधारकार्ड घेऊन यावे व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पं.स कणकवलीचे सभापती मनोज रावराणे यांनी केलेले आहे . ही योजना 5 ऑक्टोबर 2021 ते 5 नोव्हेंबर 2021 या 1 महीन्यांच्या कालावधीत कणकवली तालुकयात राबवीणेत येणार असून याचे नियोजन जि.प.मतदार संघनिहाय करण्यात आलेले असून ते खालीलप्रमाणे जि.प. मतदार संघ जानवलीतील जानवली हुंबरट , साकेडी , तिवरे , बेळणे खु! तसेच कलमठ मतदार संघातील वरवडे , पिसेकामते , कासरल , सातरल , आशिये ,कलमठ या गावांसाठी 5 ते 12 ऑक्टोबर 2021 असा कालावधी देण्यात आला आहे. खारेपाटण जि.प. मतदार संघातील तरळे , वारंगांव , शिडवणे , कुरंगवणे , साळीस्ते खारेपाटण,नडगीवे , शेर्पे , चिंचवली,वायंगणी तसेच कासार्डे जि.प.मतदार संघातील नांदगांव , तोंडवली , असलदे , कोळोशी , आयनल कासार्डे , ओझरम , दारूम या गावांसाठी 13 ते 20 ऑक्टोबर 2021 असा कालावधी देण्यात आला आहे.

फोडाघाट जि.प. मतदार संघातील लोरे नं .1 , घोणसरी , वाघेरी , पियाळी, फोडाघाट व हरकुळ बु . जि.प. मतदार संघातील हरकुळ खु . कोडये , डामरे , गांधीनगर , भिरंवडे , करूळ,हरकुळ बु . नागवे , करंजे गावांसाठी 21 ते 28 ऑक्टोबर 2021 असा कालावधी देण्यात आला आहे. कळसुली जि.प.मतदार संघातील कळसुली , शिरवल , हळवल , कसवण – तळवडे वागदे , ओसरगांव , बोर्डवे व नाटळ जि.प.मतदार संघातील सांगवे , नाटळ , कुंभवडे नरडवे , दिगवळे , दारीस्ते , शिवडांव या गावांसाठी 29 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2021 असा कालावधी देण्यात आला आहे.

आम.नितेश राणे यांचे विशेष प्रयत्नातून कणकवली तालुकयात केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळवून दिल्याबददल त्यांचे विशेष आभार कणकवली पं.स सभापती मनोज रावराणे व उपसभापती प्रकाश पारकर यांनी मानले आहेत. नियोजनाचा लाभ मंजूर यादीमध्ये असणाऱ्या पात्र लाभार्थिनी घ्यावा तसेच आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी येताना आयुष्यमान योजनेच्या लाभाचे पत्र आले असल्यास ते लाभार्थिनी घेऊन यावे या योजनेचा फायदा जवळपास 1350 आजारांवर होणार असून यामध्ये कणकवली तालुकयातील एकूण 20212 पात्र लाभार्थी आहेत . त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी या केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा . जेणेकरून या योजनेचा फायदा भविष्यातही या पात्र लाभार्थींना होणार आहे . असे आवाहन सभापती मनोज रावराणे व उपसभापती प्रकाश पारकर यांनी केले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − six =