You are currently viewing आरती भगवान परशुरामाची

आरती भगवान परशुरामाची

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.प्रज्ञा कुलकर्णी यांची आरती काव्यरचना

जय देव जय देव जय परशुरामा
हो जय भार्गव रामा,
निशीदिन प्राणा अर्पूनी
मन निर्भय हे कामा…..||धृ||

अगम्य शक्ती लाभे,परशुरामासी
दशदिशा उजळल्या मातापुरासी
माता रेणुका ही,झाली हो जननी
हर्षोल्लासाने ती फुलली अवनी ||१||

जय देव जय देव जय परशुरामा
हो जय भार्गव रामा……||धृ||

ह्रदयी शोभतसे,रूद्राक्ष माळा
खडग् धनुष्य,पेलले लीलया
तेजःपुंज मुख ,शक्ती सामर्थ्याची
करूया हो आरती परशुरामाची ||२||

जय देव जय देव जय परशुरामा
हो जय भार्गव रामा…….||धृ||

शरण आम्ही सदा,तुझ्या चरणासी
साष्टांग नमन देवा,तव सामर्थ्यासी
विश्वामित्रही तुजला,नमस्कार करती
जगदोद्धार करण्या,देव अवतार घेती ||३||

जय देव जय देव जय परशुरामा
हो जय भार्गव रामा…..||धृ||

दानवांचे त्राही पलायन करवीसी
संकटी भक्तांचे जीवन रक्षिसी
तुझ्या नामाचा करे जयजयकार किती
पंचप्राणाने तुजला, प्रज्ञा आरती गाती ||४||

जय देव जय देव परशुरामा हो
जय भार्गव रामा
निशिदिन तव प्राणा अर्पुनी
मन निर्भय हे कामा ||धृ||

सौ.प्रज्ञा कुलकर्णी
#राज्ञी

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =