You are currently viewing जिल्हास्तरीय मूल्यमापणात परुळेबाजार ग्रामपंचयातीचा द्वितीय क्रमांक

जिल्हास्तरीय मूल्यमापणात परुळेबाजार ग्रामपंचयातीचा द्वितीय क्रमांक

परुळे :

 

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत कोकण विभागस्तरीय मूल्यमापन समितीने परुळेबाजार ग्रामपंचयातीला भेट देत पाहणी केली. जिल्हास्तरीय मूल्यमापणात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे विभागियस्तरावर तपासणी करण्यात आली. यावेळी समितीत मनीषा देवगुणे सहाय्यक आयुक्त विकास पूजा संखे कनिष्ठ प्रशासन अधिकारी पूजा साळगावकर पर्यवेक्षिका शाखा अभियंता विठलं लांबोरे आदींचा समावेश होता. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, गटविकास अधिकारी उमा पाटील, विस्तार अधिकारी संदेश परब, संतोष पाटील, श्री मठकर स्वच्छता विभाग वेंगुर्ला अक्षता नाईक, श्रीम परब, सरपंच श्वेता चव्हाण, माजी सरपंच प्रदीप प्रभू, उपसरपंच मनीषा नेवालकर, ग्रा पं सदस्य सुनील चव्हाण, शांताराम पेडणेकर, विद्या दाभोलकर, प्रणिता ताडेेल, ग्रामसेवक शरद शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रसाद पाटकर, आदींसह महिला समूह गट सदस्य्य, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविकाा आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कमिटीने ग्रामपंचायतने अभियान काळात केलेल्या कामाची पाहणी केली. ग्रामपंचायत डिजिटल अंगणवाडी शाळा समाजमंदिर काथ्या व्यवसाय कंपनी महिला समूहाचे विविध उपक्रम वैयक्तीक स्वच्छता सार्वजनिक स्वच्छता याची पाहणी करण्यात आली व सर्व पाहणी करून समितीने समाधान व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =