You are currently viewing आमदार वैभव नाईक…वाढदिवस अभिष्टचिंतन

आमदार वैभव नाईक…वाढदिवस अभिष्टचिंतन

आमदार वैभव नाईक यांचा आज वाढदिवस….

 

कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक म्हणजे सर्वसामान्यांचे प्रतिनिधी. जनतेच्या हितासाठी अगदी रस्त्यावर उतरून देखील लढा देणारे नेतृत्व.

नेतृत्व करताना जिल्हा पोलीस प्रमुखांनी केलेल्या लाठी हल्ल्यात त्यांना भिडल्यापासून महाराष्ट्रात त्यांची ओळख निर्माण झाली होती.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद लाभलेले वैभव नाईक यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव केल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात जॉईंट किलर म्हणून ते ओळखले जाऊ लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील सिंधुदुर्ग जिल्यातील युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या अविश्वसनीय कामगिरीमुळे उद्धव ठाकरेंचा त्यांच्यावर वरदहस्त आहे.

विधानसभेच्या सभागृहात अभ्यासपूर्ण मुद्देसूद भाषण करत आपल्या मागण्या मान्य करून घेण्यात ते माहीर आहेत. कोकणात आलेल्या पूर संकटात देखील ते भर पुराच्या पाण्यातून लोकांच्या दारापर्यंत पोचले होते. कोरोनाच्या काळात स्वतःवर आलेले कोरोनाचे संकट बाजूला ठेवून ते जनतेसाठी गावोगावी फिरत होते.

गेली कित्येकवर्षं प्रतीक्षेत असलेला कुडाळ बसस्थानक एका वर्षात पूर्णत्वास नेत त्यांनी आपल्या कामाची पोचपावती दिली आहे.

खासदार विनायक राऊत यांच्या देखील ते जवळचे मानले जातात. आपल्या मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील गावागावांमध्ये त्यांचा शिवसैनिकांशी दांडगा संपर्क आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी गावागावातील वाडी वाडी मध्ये जाऊन शिवसेना वाढविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते.

राजकारणात असताना वेळात वेळ काढून स्थानिक युवकांच्या क्रिकेट सामान्यांची उद्धघाटन असो वा त्यांच्यात क्रिकेटर म्हणून समरस होणे असो, ते मुलांमध्ये मिळून मिसळून आपल्यातील आमदाराला दूर ठेवतात.

कोकणातील शेतकऱ्यांनी पिकवलेली कलिंगड असो वा इतर पिके, पिकेल ते विकेल या तत्वांवर विश्वास ठेवत ते शेतकऱ्यांसोबत असतात.

गोरगरिबांच्या व्यथा सुद्धा जिथे भेटतील तिथे ऐकत त्यांना त्यातून सोडविण्यासाठी स्वतः प्रयत्न करतात.

वारकरी मेळावा असो वा धार्मिक सामाजिक कार्य असो, वैभव नाईकांचा त्यात सहभाग असतोच.

कोकणातील कोणत्याही प्रश्नांसाठी ते कोणाही मंत्र्यांना बेधडक जाऊन भेटतात आणि आपला प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतात.

केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चा असो वा आंदोलन वैभव नाईक कधीच मागे राहत नाहीत, ढाण्या वाघासारखे ते त्याचे नेतृत्व करतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या वेळी नारायण राणे यांचे प्राबल्य होते त्यावेळी त्यांच्या विरोधात बोलण्याची हिम्मत कोणत्याही पक्षाच्या नेत्यांमध्ये नव्हती. परंतु वैभव नाईक हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाल्यानंतर नारायण राणे यांच्या विरोधात ते उभे ठाकले होते. सर्वसामान्य जनतेसाठी जनतेत मिसळून लढणारा कोकणचा खराखुरा शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणजे आमदार वैभव विजय नाईक….

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे युवा नेतृत्व कोकणचा वाघ आमदार वैभव नाईक यांचा आज वाढदिवस….

संवाद मिडियाकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भावी राजकीय वाटचाल यशस्वी होवो या सदिच्छा..

प्रतिक्रिया व्यक्त करा