गुरुपौर्णिमेनिमित्त सावंतवाडीत श्री साई पालखीचे आगमन; आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी पूजन
२८ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता पूजन सोहळा; २९ जुलैला पालखी माडखोलकडे रवाना
सावंतवाडी
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सावंतवाडीत श्री साई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता श्री साई पालखीचे आमदार दीपक केसरकर यांच्या ‘श्रीधर’ निवासस्थानी आगमन होणार आहे.
यावेळी आमदार दीपक केसरकर आणि सौ. पल्लवी केसरकर यांच्या शुभहस्ते श्री साई पालखीचे विधिवत पूजन करण्यात येणार आहे. या पवित्र पूजन सोहळ्यास सर्व कार्यकर्ते व साई भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, बुधवार, दि. २९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता श्री साई पालखी पुढील प्रवासासाठी माडखोलकडे रवाना होणार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सर्व साई भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
