You are currently viewing विधानसभा उपाध्यक्ष मा. नरहरी झिरवाळे साहेब यांच्या खाजगी दौऱ्या दरम्यान सावंतवाडीला धावती भेट.

विधानसभा उपाध्यक्ष मा. नरहरी झिरवाळे साहेब यांच्या खाजगी दौऱ्या दरम्यान सावंतवाडीला धावती भेट.

सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले स्वागत.

दरम्यान आपल्या खाजगी दौऱ्यावर असलेले विधानसभा उपाध्यक्ष मा. नरहरी झिरवाळे साहेब यांचे सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच सावंतवाडी तालुका मधील विविध आरोग्य व पर्यटनदृष्ट्या असलेल्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली व शासनामार्फत या अडचणींवर मात करण्यासाठी लवकरात लवकर त्यांच्या स्तरावरून उपाययोजना करून मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली. त्या अनुषंगाने मा. झिरवाळे साहेबांनी आपण लवकरात लवकर उपमुख्यमंत्री आरोग्य मंत्री व ग्रामविकास मंत्री यांची एकत्रित बैठक लावून यावर लवकरात लवकर मार्ग काढू असा शब्द दिला. याप्रसंगी सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, डि. के. टुरिझमचे मालक डी. के. सावंत व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा