You are currently viewing सावंतवाडीत श्री औदुंबर स्वामी समर्थ मंदिरात २९ जुलैला भव्य गुरुपौर्णिमा उत्सव

सावंतवाडीत श्री औदुंबर स्वामी समर्थ मंदिरात २९ जुलैला भव्य गुरुपौर्णिमा उत्सव

सावंतवाडीत श्री औदुंबर स्वामी समर्थ मंदिरात २९ जुलैला भव्य गुरुपौर्णिमा उत्सव

अभिषेक, दात्यांचा सत्कार, नामजप, भजन, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन; स्वामी भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन

सावंतवाडी

येथील पोलीस लाईन परिसरातील श्री औदुंबर स्वामी समर्थ मंदिरात बुधवार, २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात सर्व स्वामी भक्तांनी सहभागी होऊन स्वामी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाने केले आहे.
उत्सवाची सुरुवात सकाळी ८ वाजता श्री. भगवान नाईक व सौ. भारती नाईक यांच्या हस्ते श्री स्वामींचा अभिषेक व तुळस पूजनाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता मंदिर उभारणीत सहकार्य करणाऱ्या दात्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत नामजप व पोथीवाचन, दुपारी १ वाजता महाआरती, त्यानंतर दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, तसेच सायंकाळी ४ ते ७ या वेळेत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ७ ते ७.३० या वेळेत महाआरतीने उत्सवाची सांगता होणार आहे.
अन्नदान करण्याची इच्छा असलेल्या भक्तांनी निधी किंवा धान्याच्या स्वरूपात सहकार्य करावे, असे मंदिर व्यवस्थापनाने आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी ९९२२३१६७७७ किंवा ९६०७२९३५८८ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा